Google चा युजर्ससाठी अलर्ट; पासवर्डची पद्धत बदला अन्यथा हॅकिंगचा धोका!

Google Urgent Alert: पासकी ही एक नवीन लॉगिन सिस्टीम आहे जी पासवर्डऐवजी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन जसे फिंगरप्रिंट, फेस स्कॅन किंवा पॅटर्न लॉक वापरते.

जाहिरात
Read Time: 2 mins

Dump Passwords Now Or Risk Getting Hacked: गुगलने आपल्या युजर्सना इशारा दिला आहे की पासवर्ड आणि टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) सारख्या जुन्या साइन-इन पद्धतींपासून पुढे जाणे आता खूप महत्वाचे आहे. गुगल आता आपल्या युजर्सना पासकी आणि सोशल साइन-इन सारख्या नवीन, सुरक्षित लॉगिन सिस्टमचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गुगलच्या मते , 61 टक्के ईमेल युजर्स सायबर हल्ल्यांचे बळी ठरले आहेत आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या वाढत्या वापरामुळे हे धोके आणखी वाढले आहेत. गुगल स्पष्ट केले की, पासवर्ड आता सुरक्षित राहिलेले नाहीत आणि त्यांची देखभाल करणे त्रासदायक आहे. पासवर्ड अनेकदा डेटा लीक आणि फिशिंग अटॅकचे सोपे बळी ठरतात. ज्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती हॅकर्सच्या हाती पडू शकते.

(नक्की वाचा- पुणेकरांनो सावधान! 5 महिन्यांत 21 जण ‘डिजिटल अरेस्ट'च्या जाळ्यात! कोट्यवधींची फसवणूक)

पासकी म्हणजे काय?

पासकी ही एक नवीन लॉगिन सिस्टीम आहे जी पासवर्डऐवजी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन जसे फिंगरप्रिंट, फेस स्कॅन किंवा पॅटर्न लॉक वापरते. म्हणजेच फिशिंग अटॅकमध्ये ते हॅक करणे जवळजवळ अशक्य आहे.

(नक्की वाचा - Navi Mumbai News: इंग्लंडहून महागडे गिफ्ट पाठवलं, एक फोन अन् महिलेच्या खात्यातून 50 लाख फुर्रर्रर्रssss)

Gen Z एक पाऊल पुढे

रिपोर्ट्सनुसार, जनरेशन झेड युजर्स वेगाने Passkeys आणि Social Sign-ins कडे वळत आहेत. तर जुनी पिढी अजूनही पासवर्ड आणि ओटीपी सारख्या प्रणाली वापरत आहे. ज्या आजच्या काळात सुरक्षित मानल्या जात नाहीत.  जर तुम्ही तुमच्या डिजिटल सुरक्षेबद्दल गंभीर असाल, तर आजच जीमेल, गुगल, इंस्टाग्राम सारख्या अकाउंटमध्ये पासकी किंवा ट्रस्टेड सोशल साइन-इन अॅक्टिव करा.

Advertisement