Google Year in Search: गुगलवर भारतीयांनी सर्वाधिक सर्च केला 5201314 नंबर, काय आहे अर्थ?

Google Search यादीत पाचव्या क्रमांकावर असलेला 5201314 हा एक नंबर (Number) आहे, ज्याचा अर्थ भारतीयांनी सर्वाधिक सर्च केला. गुगलनुसार, 5201314 हा एक चिनी इंटरनेट स्लँग आहे, जो Mandarin भाषेतून घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Google search trend
Google

Google Year in Search : जगभरातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलने दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षाच्या अखेरीस 'ईयर इन सर्च 2025' अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार, यावर्षी सर्चमध्ये AI (Artificial Intelligence) ची सुरुवात झाली. ज्यामुळे लोकांना माहिती शोधण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे.

गुगलने 12 प्रमुख कॅटेगरीमध्ये सर्वाधिक सर्च ट्रेंड (Search Trends) शेअर केले आहेत. ज्यात चित्रपट, लोक, एआय, क्रीडा स्पर्धा, सामने, महिला क्रिकेट, बातम्या, ट्रव्हल, रेसिपी, व्हॉट्स इज (What's Is), अर्थ (Meaning) आणि नियर मी (Near Me) यांचा समावेश आहे.

Advertisement

गुगल सर्चवर लोकांनी वर्षभरात ज्या शब्दांचे अर्थ सर्वाधिक शोधले, त्यामध्ये खालील शब्द अग्रस्थानी आहेत.

  1. Ceasefire meaning
  2. Mock Drill meaning
  3. Pookie meaning
  4. Mayday meaning
  5. 5201314 meaning
  6. Stampede meaning
  7. Ee Sala Cup Namde meaning
  8. Nonce meaning
  9. Latent meaning
  10. Incel meaning

(नक्की वाचा-  Top Destinations of India: देशातील 5 अशी सुंदर ठिकाणे... नववर्षात एकदा जाऊन याच!)

सर्वाधिक सर्च झालेला कोड '5201314'

या यादीत पाचव्या क्रमांकावर असलेला 5201314 हा एक नंबर (Number) आहे, ज्याचा अर्थ भारतीयांनी सर्वाधिक सर्च केला. गुगलनुसार, 5201314 हा एक चिनी इंटरनेट स्लँग आहे, जो Mandarin भाषेतून घेतला आहे. या संपूर्ण कोडचा अर्थ "I love you for a lifetime" असा होतो. हा प्रेम व्यक्त करणारा कोड सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.

एकूण सर्चमधील शब्द (Overall Search Trends)

  • Indian Premier League (IPL)
  • Google Gemini
  • Asia Cup
  • ICC Champions Trophy
  • Pro Kabaddi League
  • Maha Kumbh Mela
  • Women's World Cup
  • Grok
  • Saiyaara
  • Dharmendra