तुमच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने व्हॉट्सॲपच्या 'या' नव्या बदलावावर लावला ब्रेक; पाहा काय आहे नेमके कारण

WhatsApp Username Feature: केंद्र सरकारने या संदर्भात मेटा कंपनीला एक नोटीस पाठवली असून, या फीचरबाबत 3 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
WhatsApp Username Feature: सरकारने घेतलेल्या या भूमिकेमुळे व्हॉट्सॲपचे हे नवे फीचर तूर्तास होल्डवर गेले आहे.
मुंबई:

WhatsApp Username Feature: जगभरात 3 अब्जांपेक्षा जास्त युझर्स असणाऱ्या व्हॉट्सॲपवर लवकरच एक मोठा बदल पाहायला मिळणार होता, ज्या अंतर्गत लोकांना आपला मोबाईल नंबर शेअर न करता केवळ 'युझरनेम' म्हणजेच व्हॉट्सॲप आयडी वापरून इतरांशी कनेक्ट होता येणार होते. मेटा कंपनीने या फीचरच्या माध्यमातून युजर्सच्या प्रायव्हसीचे रक्षण करण्याचा दावा केला होता, मात्र भारतामध्ये हे बहुप्रतिक्षित फीचर रोल आऊट होण्यापूर्वीच केंद्र सरकारने त्याला मोठा ब्रेक लावला आहे. 

केंद्र सरकारने या संदर्भात मेटा कंपनीला एक नोटीस पाठवली असून, या फीचरबाबत 3 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने घेतलेल्या या भूमिकेमुळे व्हॉट्सॲपचे हे नवे फीचर तूर्तास होल्डवर गेले आहे.

Advertisement

काय आहे सरकारला भीती?

केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन युझरनेम फीचरचा वापर करून सायबर गुन्हेगार सरकारी विभाग, सार्वजनिक अधिकारी, बँका तसेच इतर नामांकित संस्थांच्या नावांचे बनावट आयडी तयार करू शकतात. यामुळे डिजिटल अटक, ऑनलाइन फसवणूक, फिशिंग आणि तोतयागिरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते, अशी भीती सरकारने व्यक्त केली आहे. 

( नक्की वाचा : नोकरी शोधून थकलेल्या इंजिनिअरने Linkedin Profile केला 'हा' एक बदल; 2 आठवड्यांत मिळालं कोट्यवधींचं पॅकेज! )
 

सायबर गुन्हेगार किंवा आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यक्तींचा माग काढणे या फीचरमुळे कठीण होणार आहे का, याचीही पडताळणी सरकारी अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.

मेटा कंपनीला पाठवलेल्या नोटिसीमध्ये सरकारने म्हटले आहे की, या नव्या फीचरमुळे गुन्हेगारांना बळी पडणाऱ्या नागरिकांना थेट मेसेज पाठवणे सोपे होईल. तसेच, मूळ संस्था किंवा व्यक्तीच्या नावाशी मिळतेजुळते युझरनेम तयार करून लोकांची फसवणूक केली जाऊ शकते. 

त्यामुळे या सिस्टीममध्ये सुरक्षिततेचे कोणते उपाय करण्यात आले आहेत आणि फसवणूक रोखण्यासाठी मेटा कंपनीची काय योजना आहे, याचे उत्तर मागवण्यात आले आहे. मेटाच्या प्रतिसादानंतर आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतरच सरकार यावर आपला अंतिम निर्णय घेणार आहे.

Advertisement

( नक्की वाचा : IMD Rain Alerts: हवामान खात्याच्या 'या' 4 अलर्ट्सचा अर्थ माहितीये का? जाणून घ्या कोणत्या रंगात दडलाय किती पाऊस )
 

व्हॉट्सॲपचा दावा काय?

दुसरीकडे, मेटा कंपनीने हे फीचर मोबाईल नंबर सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केल्याचे म्हटले होते. व्हॉट्सॲपच्या या प्रस्तावित सिस्टीममध्ये युजर्स शोधण्यासाठी कोणतीही खुली डिरेक्टरी किंवा सूचना असणार नाहीत. म्हणजेच, जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला अचूक युझरनेम माहीत नसेल, तोपर्यंत कोणालाही मेसेज करता येणार नाही. याशिवाय, युजर्स त्यांच्या युझरनेमसाठी एक सुरक्षित की सेट करू शकतील, ज्यामुळे अनोळखी व्यक्ती थेट संपर्क साधू शकणार नाहीत आणि ही की कधीही बदलता येऊ शकते, असे दावे कंपनीकडून करण्यात आले होते.
 

Topics mentioned in this article