Extra Marital Affair: विवाहबाह्य संबंधासाठी 'हे' शहर नंबर वन! मुंबई, पुणे, दिल्लीचा कितवा क्रमांक? पाहा यादी

विशेष म्हणजे छोट्या शहरांमध्ये असे प्रकार जास्त होताना दिसत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • भारतात विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण वेगाने वाढत आहे
  • तामिळनाडूतील कांचीपुरम शहर सलग दुसऱ्यांदा विवाहबाह्य संबंधासाठी नंबर वन वर आहे.
  • Gleeden या विवाहबाह्य डेटिंग प्लॅटफॉर्मने भारतातील युजर्सची संख्या 40 लाखांपेक्षा अधिक असल्याचा दावा केला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

भारतात विवाहबाह्य संबंधांचे (Extra Marital Affairs) प्रमाण वेगाने वाढत आहे. याबाबतचा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. विशेष म्हणजे, यामध्ये मेट्रो शहरांपेक्षा लहान शहरांमधील युजर्स आघाडीवर आहेत. ग्लोबल डेटिंग प्लॅटफॉर्म 'Ashley Madison' च्या May 2026 च्या आकडेवारीनुसार ही बाब उघड झाली आहे. या अहवालानुसार मुंबई, पुणे, दिल्ली किंवा बंगळुरू या शहरांना विवाहबाह्य संबंधांमध्ये मागे टाकण्यात आले. त्यांच्या ऐवजी एका छोट्या शहराने बाजी मारल्याचं दिसत आहे. त्यामुळे मोठं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.   

तामिळनाडूचे कांचीपुरम शहर सलग दुसऱ्यांदा भारतात सर्वाधिक नवीन साईन-अप्स नोंदवणारे शहर ठरले आहे. मंदिरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांचीपुरम पाठोपाठ कोईम्बतूर, तिरुवल्लूर आणि चेन्नई या दक्षिण भारतीय शहरांचा क्रमांक लागतो. दिल्ली, मुंबई सारखी मोठी शहरे या यादीत मागे पडली आहेत. ग्लोबल डेटिंग प्लॅटफॉर्मच्या आकडेवारीनुसार ही बाबत समोर आली आहे. ​या प्लॅटफॉर्मच्या सदस्यत्वाबाबत भारताने मोठी झेप घेतल्याचं ही अलिकडच्या काळात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विवाहबाह्य संबंधात अनेकांना रस असल्याचंच दिसून येत आहे. 

Advertisement

नक्की वाचा - वयाच्या 40 शीनंतर पक्के मित्र का दुरावतात? वाचा खरी कारणे, तुम्ही ही म्हणाल, खरोखर असं असतं का?

गेल्या वर्षी 20 देशांच्या यादीत 8 व्या स्थानावर असलेला भारत आता थेट 3 ऱ्या स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय 'Gleeden' या दुसऱ्या प्रसिद्ध विवाहबाह्य डेटिंग प्लॅटफॉर्मने भारतात आपल्या युजर्सची संख्या 40,00,000 (4 मिलियन) पार केल्याचा दावा केला आहे. 2024 मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात 25 ते 50 वयोगटातील 60% पेक्षा जास्त विवाहित लोकांनी विवाहबाह्य संबंधांबाबत सकारात्मक किंवा मोकळा दृष्टिकोन असल्याचे मान्य केले होते.

नक्की वाचा - Thane News: एकाच नंबरच्या दोन रिक्षा, बोकडामुळे मिळाली चोराला शिक्षा! एक चूक नडली अन् चोरीचा पर्दाफाश

​तज्ज्ञांच्या मते, हा बदल केवळ महानगरांपुरता मर्यादित राहिलेला नाही. इंटरनेटच्या विस्तारामुळे लहान शहरांमध्ये डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढली आहे. महिलांचे आर्थिक स्वावलंबन, वाढते एकटेपण, मानसिक ताणतणाव आणि जुन्या रूढी-परंपरा मोडून स्वतःच्या आनंदाला प्राधान्य देण्याची मानसिकता यामुळे भारतातील नात्यांचे समीकरण वेगाने बदलत आहे. ही बाब तशी चिंतेची म्हणावी लागेल. अनेक कारणे यासाठी दिली जात आहे. विशेष म्हणजे छोट्या शहरांमध्ये असे प्रकार जास्त होताना दिसत आहेत.