जाहिरात

Thane News: एकाच नंबरच्या दोन रिक्षा, बोकडामुळे मिळाली चोराला शिक्षा! एक चूक नडली अन् चोरीचा पर्दाफाश

ठाण्यातील वाहतुकीच्या दृष्टीने तीन हात नाका सिग्नल अत्यंत महत्त्वाचा समजला जातो.

Thane News: एकाच नंबरच्या दोन रिक्षा, बोकडामुळे मिळाली चोराला शिक्षा! एक चूक नडली अन् चोरीचा पर्दाफाश
  • ठाणे वाहतूक पोलिसांनी तीनहात नाका येथे एक बोगस रिक्षा बोकडाच्या मदतीने पकडली
  • पोलिसांच्या तपासणीदरम्यान एकाच नंबरच्या दोन रिक्षा आढळल्या आणि बनावट रिक्षा जप्त करण्यात आली
  • ऑनलाईन दंड आकारल्यानंतर मूळ रिक्षाचालक घटनास्थळी आला त्यामुळे संपूर्ण घटना उघड झाली
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
ठाणे:

रिझवान शेख 

बोकडामुळे बनावट रिक्षाचा पर्दाफाश झाला आहे. ठाणे वाहतूक पोलिसांच्या चाणाक्ष पणामुळे या घटनेचा पर्दाफाश झाला आहे. ही घटना तेवढीच मजेशिर आहे. ठाण्याच्या तीनहात नाका येथे वाहतूक पोलिसांकडून तपासणी सुरू होती. शिवाय वाहतूक सुरळीत करण्याचे काम ही सुरू होते. त्याच वेळी तिथे त्यांना एक प्रवाशी रिक्षा दिसली. त्या रिक्षात एक गलेलठ्ठ बोकड होता. हे पाहाताच तिथल्या वाहतूक पोलिसांनी त्या रिक्षावर ऑनलाईन दंड आकारला. मात्र त्यानंतर खरा खेळ सुरू झाला. ऑनलाईन दंड आकारला एकाला पण तो मिळाला दुसऱ्याला. हा ऑनलाईन दंड मूळ रिक्षाचालकाकडे गेला. 

दंड मिळताच तो रिक्षा चालक तातडीने घटनास्थळी पोहोचला. आपली रिक्षा मुंब्रा इथं होती तरी आपण दंड का आकारला असा प्रश्न त्याने पोलिसांना केला. त्यावेळी एकाच नंबरच्या दोन रिक्षा आहेत हे पोलिसांच्या लगेच लक्षात आले. हा बनाव लक्षात येताच पोलिसांनी बनावट रिक्षा जप्त केली आहे. शिवाय रिक्षाचालका विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतुक उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी दिली आहे. मुळ मालकाने तत्परता दाखवली. शिवाय पोलिसांनी ही नियमानुसार दंड आकारला त्यामुळे हा सर्व खेळ उजेडात आला. त्याला खरे कारण तो बोकड ठरला. 

नक्की वाचा - Pune Accident: स्कूल बसमध्ये 50 चिमुकले, मद्यधुंद चालक अन् काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, पाहा Video

ठाण्यातील वाहतुकीच्या दृष्टीने तीन हात नाका सिग्नल  अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. या सिग्नल येथे 15 जूनला  दुपारी नौपाडा वाहतूक पोलीस निरीक्षक गौरी मोरे होत्या. त्या आपल्या पथकासह ट्राफीक कंट्रोल करण्याचे काम करत होत्या. याच वेळी घोडबंदर रोड दिशेकडील वाहिनीवर वाहतुक कोंडी झाल्याने पथकातील पोलीस नाईक जितेन्द्र पाटील, पोलीस हवालदार अभिजित भाट, चालक पोलीस शिपाई स्वानंद माने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गेले होते. त्याच वेळी ती संशयीत रिक्षा त्या ठिकाणी आली होती. ती रिक्षा पोलिसांच्या नजरेतून चुकली नाही. रिक्षामधून प्रवाश्यांऐवजी बेकायदेशीरपणे बोकडाची वाहतूक केली जात होती. त्यानुसार त्या रिक्षाचालकावर ई चलानची कारवाई करण्यात आली. 

नक्की वाचा - PM Modi France Visit: मोदींचं फ्रान्सच्या शाही हॉटेलमध्ये वास्तव्य! एका रात्रीचं भाडं ऐकून लागेल शॉक

ऑनलाईन दंड ठोठावताच काही वेळात मुंब्रा येथून एक रिक्षाचालक आपली रिक्षा घेऊन घटनास्थळी आला. आपली रिक्षा मुंब्रा येथे असताना मला दंड कसा काय आला ? अशी विचारपूस त्याने केली. त्यामुळे कारवाई करण्यात आलेली रिक्षा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. वाहतूक पोलिसांच्या कारवाई दरम्यान जमा असलेली रिक्षा आणि मूळ मालक यांच्या रिक्षाचे नोंदणी क्रमांक तपासले गेले. त्यानंतर ते एकच आढळून आले. त्यानंतर रिक्षाच्या कागदपत्रांची तपासणी केली गेली. मुंब्रा येथील शेर मोहम्मद शहा मोहम्मद यांचे वडिलांच्या नावावर रिक्षा असल्याची खात्री झाली.  रिक्षावर डुप्लिकेट नंबर लावून रिक्षा चालवत असल्याचं उघड झालं. पुढे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com