Gudi Padwa: गोडवा पसरवणारे पुण्यातील 'घर', खवय्यांसाठी 20 प्रकारच्या पुरणपोळ्यांची मेजवानी

Gudi Padwa 2024 : पुण्यातील पुरणपोळी घरामध्ये तब्बल 20 प्रकारच्या पोळींची चव खवय्यांना चाखता येणार आहे. कोणकोणते प्रकार येथे उपलब्ध आहेत, जाणून घ्या सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 3 mins
Gudi Padwa 2024: 20 प्रकारच्या पुरणपोळ्या मिळणारे घर

- प्रतिक्षा पारिख, प्रतिनिधी, पुणे

Gudi Padwa 2024: होळी असो किंवा गुढीपाडवा (Gudi Padwa), सणानिमित्त महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरांमध्ये हमखास तयार होणारा गोड पदार्थ म्हणजे 'पुरणपोळी'. सण कोणताही असो पुरणपोळी हवीच, कारण शास्त्र असते ते. गरमागरम पुरणपोळी व कटाची आमटी - या पदार्थांचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटले ना? पण आताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जॉब करणाऱ्या महिलांना पुरणपोळी तयार करणे शक्य होत नाही.

त्यामुळे अनेक जणी दुकानातून पुरणपोळी विकत घेऊन दुधाची तहान ताकावर भागवतात. असे म्हणायचं कारण म्हणजे दुकानातील पुरणपोळीला घरच्या पुरणपोळीसारखी चव येत नाही. पण जर तुम्हाला तुमच्या आईच्या हातच्या पुरणपोळीसारखीच चव चाखायला मिळाली तर? शक्य आहे मंडळींनो. बिझी लाइफस्टाइलमुळे महिलांना घर-ऑफिस अशी तारेवरची कसरत करावी लागत आहे, हीच बाब लक्षात घेऊन ज्योती कोरे आणि जितेंद्र कोरे यांनी पुण्यामध्ये खास पुरणपोळी घर सुरू केले आहे. 

पुरणपोळी घरामध्ये किती प्रकारच्या पोळ्यांची चव चाखायला मिळते? 

या पुरणपोळी घरामध्ये एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 20 प्रकारच्या पुरणपोळ्या वर्षातील 365 दिवस तयार केल्या जातात. अल्पावधीतच कोरें यांचे हे स्वादिष्ट पुरणपोळींचे घर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले आहे. येथे 30 रुपयांपासून ते 70 रुपयांपर्यंत एका पुरणपोळीची किंमत आहे.

(Sudha Murty Motivational Quotes: तुमची मुले गाठतील प्रगतीचे शिखर, फॉलो करा सुधा मूर्तींचे हे प्रेरणादायी विचार)

पुरणपोळी तयार करणे खरंतर अतिशय अवघड काम. या पदार्थाच्या पाककृतीतील सर्वात कठीण भाग म्हणजे पोळीचे पुरण तयार करणे, कारण यावरच पोळीची चव अवलंबून असते. योग्य प्रमाणात सर्व जिन्नस एकत्रित करून पुरण तयार करावे लागते. एकूणच या गोड पदार्थाची चव चाखण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात. 

(Tulsi Plant Rules: घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठे नुकसान)

पुरणपोळी घरामध्ये या पोळ्यांची चाखायला मिळेल चव 

1. डाळ पुरणपोळी

2. खोबऱ्याची पुरणपोळी

3. मुगडाळ पुरणपोळी

4. शेंगदाणा पुरणपोळी

5. गाजर पुरणपोळी

6. खजूर पुरणपोळी

7. खव्याची पुरणपोळी

8. शुगर फ्री पुरणपोळी

9. अननस पुरणपोळी

10. गुलकंद पुरणपोळी

11. चॉकलेट पुरणपोळी

12. बदाम पुरणपोळी

13. ड्रायफ्रूट पुरणपोळी

14. अंजीर पुरणपोळी

15. डाळ पुरणपोळी (जाड)

16. खोबऱ्याची पुरणपोळी (जाड)

17. 50-50 पुरणपोळी

18. फणस पुरणपोळी 

परदेशातही पाठवू शकता पुरणपोळी - ज्योती कोरे
"पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये धकाधकीच्या आयुष्यामध्ये खवय्यांना पुरणपोळीविना सण साजरा करावा लागू नये, यासाठी आमचे पुरणपोळी घर कायम सज्ज असते. महत्त्वाचे म्हणजे सर्व प्रकारच्या पुरणपोळ्या तब्बल 10 दिवस टिकून राहू शकतात. यामुळे आपण येथून परदेशातही आपल्या नातेवाईक व मित्रपरिवाराला पोळ्या पाठवू शकता. रव्याच्या पिठापासून पुरणपोळी तयार केली जात असल्याने दहाव्या दिवशी देखील पोळीची चव ताज्या पोळीप्रमाणेच स्वादिष्ट लागते", अशी माहिती ज्योती कोरे यांनी दिली.  

Advertisement

 
सण कोणताही असो पुरणपोळीवर ताव मारण्यासाठी प्रत्येक पुणेकराची पावले या पुरणपोळी घराकडे आपोआपच वळतात.  

(Happy Gudi Padwa: नातेवाईक-मित्रमैत्रिणींना गुढीपाडव्याचे हे शुभेच्छा संदेश पाठवून साजरा करा सण)

Topics mentioned in this article