Guillain-Barre syndrome : 'सकाळी उठल्यावर लक्षात आलं...' GBS ची लागण झालेल्या रुग्णानं सांगितला अनुभव

Guillain-Barre syndrome : गुईलेन बेरी सिंड्रोम (GBS) आजारानं सध्या पुणेकरांची चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्था अलर्टवर आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Guillain-Barre syndrome : गुईलेन बेरी सिंड्रोम (GBS) आजारानं सध्या पुणेकरांची चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्था अलर्टवर आहे. या आजाराबाबत पुण्यासह संपूर्ण राज्यात संभ्रमाचं वातावरण आहे. या आजाराची लागण झालेल्या आणि त्यामधून उपचारानंतर बऱ्या झालेल्या जीबीएस योद्ध्यानं आपले सर्व अनुभव NDTV मराठीशी बोलताना सांगितले आहेत. सुबोध झारे असं त्यांचं नाव असून ते 58 वर्षांचे आहेत. बडोद्याच्या झारे यांना ऑगस्ट महिन्यात या आजाराची लागण झाली होती. त्यांनी आजरपणानंतरच्या 15 दिवसांचा अनुभव 'NDTV मराठी'शी बोलताना सांगितला आहे.

अचानक झालेल्या या घटनेमुळे शर्टची बटणं लावणं, चहाचा कप उचलणे, मोबाईल उचलणे या साध्या गोष्टी करणेही त्यांना शक्य होत नव्हतं. या सर्व आजारावर घाबरुन न जाता त्यांनी कशी मात केली याची सविस्तर माहिती झारे यांनी दिली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय होता अनुभव?

सुबोध झारे यांनी सांगितलं की, ' मला या व्हायरसची लक्षण 19 ऑगस्टला दिसायला लागले. मला सकाळी उठल्यानंतर चूळ भरण्यासाठी हाताची बोटं जोडता येत नव्हता. 19 आणि 20 तारखेला दोन्ही हातांना व्हायरसच इन्फेक्शन झाले. माझ्या डॉक्टरांना हे सुरुवातीला मेओसेटीस आहे असं वाटलं होतं. त्या हिशेबाने त्यांनी गोळ्या बदलून दिल्या. 19, 20 आणि 21 ऑगस्ट रोजी त्यांना मोओसेटीस आहे, असं समजून त्या हिशेबानं त्यांनी गोळ्या दिल्या.

22 तारखेला त्यांनी मला सांधेरोग तज्ज्ञांकडे जाण्यास सांगितलं. त्यांनी प्राथमिक चौकशीनंतर मला न्यूरोलॉजिस्टकडं जाण्याचा सल्ला दिला. न्यूरोलॉजिस्टनं तिथं माझी टेस्ट केली. ही टेस्ट झाल्यानंतर डॉक्टरांनी तुम्हाला GBS चं इन्फेक्शन आहे, असं सांगितलं. 

Advertisement

( नक्की वाचा : Pune News : गुईलेन बेरी सिंड्रोम पुणेकरांची चिंता वाढवली )
 

या सर्व प्रकारात पाच दिवस उलटले होते. माझ्यावर उपाचार करणारे तीन डॉक्टर तसंच ज्या हॉस्पिटलमध्ये मी दाखल झालो होतो ते सर्व या व्हायरसंच्या इन्फेक्शनचं कारण काय? याचा शोध घेत होते. याबाबत मेडिकल इतिहासात कोणतीही जुनी केस नव्हती, असं झारे म्हणाले.

झारे यांनी याबाबत बोलताना पुढं सांगितलं की, 'या व्हायरसचं निदान लवकर होत नाही. त्याचा तुमच्या मज्जातंतूंवर परिणाम होतो. स्नायूंवरही त्याचा परिणाम होतो. फुफ्फुसापर्यंत याचं इन्फेक्शन होतं त्यावेळी रुग्णांना व्हेंटीलेटवर ठेवावं लागतं. सुदैवानं माझ्यावर ती वेळ आली नाही. पण, यामध्ये मला वजनाच्या हिशेबानं इंजेक्शन घ्यायची होती. मला माझ्या वजनाच्या हिशेबानं 26 इंजेक्शन डॉक्टरांच्या देखरेखीखाली घ्यायची होती. 22 ते 28 ऑगस्टच्या दरम्यान ही इंजेक्शन मला देण्यात आली, असा अनुभव झारे यांनी सांगितला.

Advertisement

या इंजेक्शनमुळे स्नायूचे इन्फेक्शन कमी झाले. पण फिजिओथेरीपी देखील आवश्यक आहे. 15 दिवसांच्या फिजिओथेरिपीनंतर मी उभा राहिलो. घरात चालायला लागलो. तर 45 दिवसांनंतर दुचाकी वाहनानं मी कामाला जाण्यास सुरुवात केली. 

मला आता कोणत्याही गोळ्या किंवा औषधं नाहीत. चालणे ठेवा. स्न्यायूंना व्यायम द्या असा सल्ला डॉक्टरांनी दिला. सहा महिन्यांनी पूर्ण बरं होईल असं डॉक्टरांनी सांगितलं. याकडे दुर्लक्ष करु नका. शक्यता वाटली तर त्याची पडताळणी नक्की करा. हा आजार उपचारातून बरा होतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Advertisement