रेवती हिंगवे, पुणे
पुण्यात एका नव्या आजाराने पुणेकरांची चिंता वाढवली आहे. पुण्यात गुईलेन बेरी सिंड्रोमचे (Guillain-Barre syndrome) 22 संशयित रुग्ण आढळले आहेत. ICMR-National Institute of Virology ला नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गुईलेन बेरी सिंड्रोमचे रुग्ण सापडल्याने पुणे महापालिका दक्ष झाली आहे. एनआयव्हीचा रिपोर्ट आल्यानंतर ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत, त्या भागात टीम दाखल करण्यात येणार आहे. गुईलेन बेरी सिंड्रोम हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. जो एक लाखांमध्ये एका व्यक्तीला आढळतो.
वेगळ्या पद्धतीच्या वॅक्सिन्स घेतल्या असतील किंवा H1N1 च्या वॅक्सिंन घेतल्या असतील तर काही प्रमाणात हा दुर्मिळ आजार लोकांना होऊ शकतो. याचं निदान करण्यासाठी स्पाइनल फ्लूडची चाचणी केली जाते. उपाय म्हणून प्लाज्मा एक्सचेंज सारखे उपचार केले जातात.
(नक्की वाचा - Yogesh Kadam: अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा अजब दावा; पावसावर खापर फोडलं!)
आजार दुर्मिळ असला तरीही तो धोकादायक नाही, असं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. पुणे शहरातील 6 आणि बाकी रुग्ण हे जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाच्या प्रमुख नीना बोराडे यांनी दिली आहे.
(नक्की वाचा : इन्फ्लुएन्सर बनला भिकारी! दिवसभराची कमाई पाहून सगळेच झाले चकीत)
पुण्याच्या बाहेरिल हे रुग्ण असून उपचारासाठी पुण्यात आले होते. हा आजार संसर्गजन्य नाही, त्यामुळे कुठलाही धोका नाही. ज्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल होते, त्या परिसरातही रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.