Guru Purnima 2026: भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान सर्वोच्च मानले गेले आहे. दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला गुरू पौर्णिमेचा पवित्र सण साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे आपले गुरु, शिक्षक आणि मार्गदर्शक यांच्याबाबत आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी असते. पण यंदा गुरु पौर्णिमेच्या तिथीबाबत संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. चला जाणून घेऊया की वर्ष 2026 मध्ये गुरु पौर्णिमा कधी साजरी केली जाईल?
गुरु पौर्णिमा 2026 कधी आहे? | When Is Guru Purnima 2026? | Guru Purnima Tithi
पौर्णिमा तिथीची सुरुवात 28 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजून 19 मिनिटांनी होईल आणि पौर्णिमा तिथी समाप्ती 29 जुलै रोजी रात्री 8 वाजून 06 मिनिटांनी होईल. उदया तिथीनुसार वर्ष 2026 मध्ये गुरु पौर्णिमा 29 जुलै साजरी केली जाईल. या काळात गुरुपूजन आणि धार्मिक कार्ये करणे शुभ फलदायी मानले जाते.
(नक्की वाचा: Eclipse 2026: ऑगस्ट महिन्यात अवघ्या 16 दिवसांत 2 मोठी ग्रहणे; भारतात काय होणार परिणाम? जाणून घ्या तारीख, वेळ आणि सूतक काळ)
गुरु पौर्णिमेचा दिवस का खास आहे?
गुरुंप्रति आदर-सन्मान व्यक्त करण्याव्यतिरिक्त गुरु पौर्णिमेला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वही आहे. मान्यतेनुसार या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. त्यांनी महाभारताची रचना केली आणि चार वेदांचे संकलन केले होते. हेच कारण आहे की या दिवसाला 'व्यास पौर्णिमा' असेही म्हटले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शिवशंकरानेही याच दिवशी आदिगुरुच्या रूपात सप्तर्षींना योगाचे पहिले ज्ञान दिले होते. तसेच बौद्ध धर्मात असे मानले जाते की भगवान बुद्धांनी याच दिवशी सारनाथ येथे आपला पहिला उपदेश दिला होता.
(नक्की वाचा: बाथरूममध्ये मोबाइल नेणाऱ्यांनो सावधान! संधी, पैसा जाईल अन् हा ग्रह होईल खराब; वास्तुतज्ज्ञांचा गंभीर इशारा)
गुरु पौर्णिमेच्या दिवशी काय करावे? | Guru Purnima 2026
- गुरु पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावे.
- यानंतर आपले गुरु, शिक्षक किंवा इष्ट गुरुंच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर दिवा लावावा.
- फुले अर्पण करावी आणि श्रद्धेने त्यांचा आशीर्वाद घ्यावा.
- जर तुमच्या गुरुंनी एखादा मंत्र दिला असेल, तर त्याचा जप करावा.
- ध्यान किंवा मेडिटेशन करणेही या दिवशी खूप शुभ मानले जाते.
- यामुळे मन शांत राहते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)