Guru Pushya Yoga Worship Remedies: ज्योतिष शास्त्रानुसार ज्याप्रमाणे नवग्रहांमध्ये सूर्याला आणि सर्व 27 नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्राला राजा म्हटले जाते, त्याचप्रमाणे जेव्हा पुष्य नक्षत्र देवगुरू समजल्या जाणाऱ्या गुरुवारच्या दिवशी येते, तेव्हा त्या दिवशी 'गुरु पुष्य योग' बनतो. ज्योतिषशास्त्रात हा गुरु पुष्य योग धन, धर्म, ज्ञान आणि सुख-सौभाग्य वाढवण्यासाठी अतिशय शुभ मानला गेला आहे. अशी मान्यता आहे की, गुरू पुष्य योगच्या दिवशी भगवान श्री विष्णु आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेशी संबंधित उपाय केल्यास भाविकाला लवकरच शुभ फळ मिळते. कोणते उपाय केल्यास नशीब बदलण्यास मदत मिळू शकते, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
गाईशी संबंधित महाउपाय
हिंदू धर्मात गोमातेबाबत अशी मान्यता आहे की, गाईमध्ये 33 कोटी देवी-देव निवास करतात. गुरु पुष्य योगाच्या दिवशी गोमातेची सेवा आणि पूजेशी संबंधित उपाय शुभ तसेच लवकर फळ देणारे मानले गेले आहेत. गुरु पुष्य योगाच्या दिवशी गोमातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात तयार केलेली पहिली पोळी गाईला खाऊ घाला आणि त्यांना सात वेळा प्रदक्षिणा घाला. यासोबतच पूजेमध्ये गाईचे दूध, दही, तूप, शेण इत्यादींचा विशेष वापर करा.
केळीच्या रोपाच्या पूजेचे उपाय
हिंदू मान्यतेनुसार केळीच्या रोपाचा संबंध देवगुरू बृहस्पती आणि भगवान विष्णु यांच्याशी मानला गेला आहे. अशा परिस्थितीत या देवतांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी व्यक्तीने स्नान आणि ध्यान केल्यानंतर एका तांब्यामध्ये थोडीशी हळद, हरभरा डाळ आणि गूळ एकत्रित करून केळीच्या रोपाच्या मुळाशी श्रद्धेने अर्पण करावे. जल अर्पण केल्यानंतर भाविकाने तिथे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून भगवान विष्णूंच्या - 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' आणि भगवान बृहस्पतींच्या - 'ॐ बृं बृहस्पतये नमः' या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. पूजेच्या शेवटी केळीच्या रोपाला एक किंवा पाच वेळा प्रदक्षिणा घालावी. जर तुम्ही करिअर आणि व्यवसायाशी संबंधित समस्यांशी झुंजत असाल तर आज गुरु पुष्य योगमध्ये प्रगतीच्या इच्छेने केळीच्या झाडाला पिवळा धागा बांधावा.
(नक्की वाचा : Shirdi Sai Baba: साईबाबांचे 11 महामंत्र जे तुमचं पूर्ण आयुष्य बदलतील, अपार शक्ती मिळेल आणि दुःखांचा होईल अंत)
हिंदू मान्यतेनुसार गुरु पुष्य योगच्या दिवशी श्रद्धेने एखाद्या पुजाऱ्याला किंवा धर्मगुरूंना दिलेले दान शुभ तसेच अनेक पटींनी जास्त फलदायी मानले जाते. गुरु पुष्य योगचे शुभ फळ आणि लक्ष्मीमातेसह नारायण (विष्णू) यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मंदिराच्या पुजाऱ्याला किंवा धर्मगुरूंना पिवळ्या रंगाचे वस्त्र, अन्न, धन आणि धार्मिक पुस्तके दान करा. गुरु पुष्य योगमध्ये दानाशी संबंधित हा उपाय केल्यास सुख-सौभाग्यात चौपट वाढ होते, अशी श्रद्धा आहे.
लक्ष्मी आणि नारायणाची करा विशेष पूजा
हिंदू मान्यतेनुसार गुरु पुष्य योगमध्ये श्री म्हणजेच लक्ष्मी आणि हरी म्हणजेच भगवान विष्णू यांची पूजा लवकरच फलदायी ठरते. अशा परिस्थितीत आज भगवान विष्णू आणि लक्ष्मीमातेला पिवळ्या रंगाची फुले, पिवळ्या रंगाची वस्त्र, पिवळ्या रंगाची मिठाई, केशरची खीर इत्यादी अर्पण करून 'विष्णु सहस्रनाम' आणि 'श्री सूक्त' यांचा विशेष पाठ करावा. धनाची देवी माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी त्यांना हळद, सुपारी आणि नाणे अर्पण करावे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)