
Gurupushyamrut Yoga 2025 Date And Time | Gurupushyamrut Yoga 2025 Kadhi Ahe: ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्र (Pushya Nakshtra) हे एक अतिशय शुभ नक्षत्र मानले जाते. पुष्य नक्षत्रास नक्षत्रांचा राजा देखील म्हणतात. या नक्षत्रात धनाची देवी लक्ष्मीमाता प्रकट झाली होती, असेही म्हटले जाते. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारीच्या दिवशी येते तेव्हा या संयोगाला गुरु पुष्य योग (Gurupushyamrut Yoga) म्हणतात. गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास "गुरुषुष्यामृत योग" होतो, असे म्हणतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुवार हा गुरू ग्रहाद्वारे नियंत्रित नियंत्रित केला जातो तसेच हा सर्वात फायदेशीर ग्रह देखील आहे. म्हणूनच गुरु पुष्य युती अत्यंत शुभ मानली जाते. यास "गुरु पुष्य नक्षत्र योग", "गुरु पुष्य अमृत योग" असेही म्हणतात. श्रावण महिन्यात गुरुपुष्यामृत योग कधी (Gurupushyamrut Yoga Date And Time) आहे, याचा कालावधी किती तास असणार आहे?, या काळात काय करावे आणि कोणते लाभ मिळतील? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया..
गुरुपुष्यामृत योग | Gurupushyamrut Yoga 2025
21 ऑगस्ट गुरुवारी सकाळी 6.23 वाजेपासून ते उत्तर रात्री 00.08 (AM 22 ऑगस्ट) वाजेपर्यंत गुरुपुष्यामृत योग असणार आहे.
गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय? | Gurupushyamrut Yoga 2025 Meaning
गुरुपुष्यामृत योग अतिशय शुभ आणि दुर्मीळ योग मानला जातो. गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आल्यास हा अत्यंत शुभ योग जुळून येतो. या दिवशी केलेल्या कामाचे विशेष लाभ मिळतात, असे म्हणतात.
(नक्की वाचा: Shravan 2025 Wishes In Marathi: भक्तीचा उत्सव फुलला, श्रावण मास आला! श्रावण मासारंभाच्या पाठवा खास शुभेच्छा)
गुरुपुष्यामृत योग शुभ का मानले जाते? | Gurupushyamrut Yoga 2025 Labh
- गुरुपुष्यामृत योगामध्ये केलेल्या कामामुळे धन, समृद्धी आणि आर्थिक लाभ मिळतात, असे मानले जाते.
- नवीन व्यवसाय, गुंतवणूक, खरेदी आणि महत्त्वाच्या कामांचा शुभारंभ करण्यासाठी शुभ दिवस मानला जातो.
- नवीन वस्तू, जमीन, घर, वाहन, सोन्याचे दागिने इत्यादी गोष्टी खरेदी करणे शुभ मानले जाते.
- पूजा, जप, तप आणि दानधर्म केल्यास आध्यात्मिक लाभ मिळतात.
- गुरुपुष्यामृत योगामध्ये गृहप्रवेश आणि अन्य शुभ कार्ये करणं देखील शुभ मानले जाते.
गुरुपुष्यामृत योगामध्ये काय करणे टाळावे | Gurupushyamrut Yoga 2025 What To Avoid
नकारात्मक वागणे आणि कार्य टाळा.
मांस तसेच मद्य सेवन करणं टाळा.
वादविवाद करणं टाळावे.
गुरुपुष्यामृत योग पूजा कशी करावी?
- पहाटे उठून स्नान करुन स्वच्छ वस्त्र परिधान करा.
- घरातील देवाऱ्हामध्ये तुपाचा दिवा लावावा.
- लक्ष्मीमातेसह सर्व देवांना फळ, पुष्प, गंध, नैवेद्य अर्पण करुन पूजा करावी.
- लक्ष्मीमातेच्या मंत्राचा 108 वेळा जप करावा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world