Hair Care News: शरीरातील कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे केसगळती होते? जाणून घ्या कारण

Hair Care News: शरीरातील काही महत्त्वाच्या घटकांची कमतरता निर्माण झाल्यासही केसांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. केसगळती, केस पातळ होणे, केस तुटणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया यामागील कारण सविस्तर...

जाहिरात
Read Time: 3 mins
"Hair Care News: केसगळती होण्यामागील कारण काय?"
Canva

Hair Care News: धकाधकीच्या आयुष्यात महिलांना आरोग्याशी संबंधित अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. केसगळती, पिंपल्स, मासिक पाळी वेळेवर न येणे किंवा मासिक पाळीदरम्यान प्रचंड वेदना होणे इत्यादी. या समस्यांकडे अनेकदा तणाव, वाढते वय किंवा हार्मोनल बदल समजून दुर्लक्ष केले जाते. पण डॉक्टर आणि आयुर्वेदाचार्यांच्या मते या सर्व समस्यांमागील कारण बहुतांश वेळेस शरीरातील झिंकची कमतरता असल्याचे दिसून आलंय. झिंक हे एक असे खनिज आहे, जे शरीराला कमी प्रमाणात आवश्यक असते, पण त्याचे काम फार मोठे असते.  

शरीरासाठी झिंक का आवश्यक आहे? | Hair Loss News

विज्ञानानुसार शरीरातील पेशींची दुरुस्ती (Repair), शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे, हार्मोन्सचे संतुलन राखणे आणि डीएनए (DNA) निर्मितीमध्ये झिंक महत्त्वाची भूमिका बजावते. आयुर्वेदानुसार झिंक शरीरातील धातू मजबूत करते आणि अग्नी म्हणजेच पचनशक्ती संतुलित ठेवण्यास मदत करते. जेव्हा शरीरात झिंकची कमतरता निर्माण होते, तेव्हा त्याचे परिणाम हळूहळू केस, त्वचा आणि मासिक पाळीच्या चक्रावर दिसू लागतात.

'इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रीसर्च' (ICMR) नुसार, प्रौढ महिलांना दररोज साधारणपणे आठ ते 12 मिलीग्रॅम झिंकची आवश्यकता असते. हे प्रजनन आरोग्य, जखमा भरणे आणि हार्मोनल संतुलनासाठी अत्यंत गरजेचे आहे.

(नक्की वाचा: Jeera Watar Benefits: जिऱ्याचे पाणी कसे आणि कधी प्यावे? शरीरात कोणते बदल होतील? तज्ज्ञांनी दिली मोठी माहिती)

माझ्या शरीरात झिंकची कमतरता निर्माण झालीय, हे कसे ओळखावे?

डॉक्टरांच्या मते,  झिंक एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन यासारख्या हार्मोन्सना संतुलित ठेवण्यास मदत करते. जेव्हा झिंकची कमतरता निर्माण होते तेव्हा त्याचा थेट परिणाम मासिक पाळीवर होतो.

Advertisement
  • मासिक पाळीतील समस्या: पाळी उशीरा येणे, प्रचंड वेदना होणे किंवा अतिरक्तस्त्राव होणे.
  • PMS ची लक्षणे: चिडचिडेपणा, शरीराला सूज येणे आणि मूड बदलत राहणे.
  • थायरॉइड आणि थकवा: झिंकचा संबंध थायरॉइड ग्रंथीशी देखील असतो, जी शरीरातील ऊर्जा आणि मासिक पाळीचे नियंत्रण करते. शरीरातील झिंकची पातळी कमी असल्यास थकवा, अशक्तपणा आणि पाळीतील अनियमितता एकाच वेळी जाणवू शकते.
(नक्की वाचा: Vastu Tips: जेवण कोणत्या दिशेला बसून करावं? कोणती दिशा टाळावी? जेवणाआधी कोणता मंत्र म्हणावा? काय आहे शास्त्र)त्वचा आणि केसांवर होणारे परिणाम

केस गळण्यामध्ये झिंकची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. हे हेअर फॉलिकल्स (केसांचे मूळ) मजबूत करते आणि नवीन पेशींच्या निर्मितीमध्ये मदत करते. शरीरात झिंक कमी असल्यास केस पातळ आणि कमकुवत होतात. तसेच चेहऱ्यावर पिंपल वाढण्याचे कारणही झिंकची कमतरता असू शकते, कारण झिंक त्वचेची जळजळ (Inflammation) कमी करण्यास आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )