-डॉ. रुचा पै
Jeera Watar Benefits: आयुर्वेदात जिरे म्हणजे जिरक. दीपन, पचन आणि वातनुलोमन करणारे श्रेष्ठ औषध योग्य प्रमाणात घेतल्यास जठराग्नी वाढवते. अपचन, गॅस, आम्लपित्त कमी करते, पोट हलकं ठेवते, फुगवटा आणि जडपणा कमी होण्यासही मदत मिळते. शरीरातील आम बाहेर फेकले जाऊन शरीर डिटॉक्सही होते. मासिक पाळीदरम्यानच्या समस्याही कमी होतात आणि वजन नियंत्रणात राहण्यासही मदत मिळते.
Jeera Water Benefits | Cumin Water Benefits | Weight Loss Tips
- जिरे मुख्य आयुर्वेदिक कर्म -
- दीपन जठराग्नि प्रज्वलित करते
- पाचन - आमपचन करते
- वातानुलोमन - गॅस पोटफुगी कमी करते
- शूलप्रशमन - पोटदुखी शमवते
- रुच्य- चव आणि भूक वाढवते
- ज्वरघ्न ज्वरात सहाय्यक
- मेध्य - बुद्धिवर्धक
- बल्य - बल आणि शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवते
- चक्षुष्य - डोळ्यांसाठी हितकर
- गर्भाशयविशुद्धीकर - गर्भाशय शुद्धी म्हणूनच पोस्ट पार्टेम केअरमध्ये मोठ्या प्रमाणात जिऱ्याचा वापर केला जातो
जिऱ्यातील पोषणतत्त्व
- पचन सुधारते, डायजेस्टिव्ह एन्झाइम्स वाढवते आणि गॅस-अपचन कमी करते
- पोटामध्ये येणारे पेटके कमी होण्यास मदत मिळते
- वातनाशक
- अँटी-ऑक्सिडंट्स : फ्री रॅडिकल्स कमी करून शरीराला सेल्युलर प्रोटेक्शन देण्याचे काम करते
- अँटी-इन्फ्लेमेटरी : गट आणि मेटाबॉलिक इन्फ्लेमेशन कमी करते
- अँटी-मायक्रोबिअल : गट मायक्रोबायोटिक संतुलन राखते
- ब्लड शुगर सपोर्ट : इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते
- मेटाबॉलिज्म आणि वजन : फॅट मेटबॉलिज्म सुधारण्यास मदत मिळते
- हृदयाचे आरोग्य : एलडीएल ऑक्सिडेशन कमी करते, लिपिड सपोर्ट
- महिलांचे आरोग्य : मासिक पाळीदरम्यान पोट फुगण्याची समस्या कमी होण्यास मदत मिळेल
- न्युट्रिशन : लोह आणि कॅल्शिअम शोषून घेण्याची क्षमता वाढते.
आयुर्वेदानुसार घरगुती उपाय
पाळीतील वेदना कमी करण्यासाठी जीरे आणि गुळाचा उपाय करावा
जिरेपूड गुळासोबत घ्यावी
पाळी येण्याच्या एक ते दोन दिवस आधी हा उपाय सुरू करावा
वातदोषजन्य वेदना आणि कळा कमी होतील
गर्भाशयातील आंकुचन शमवण्यास मदत मिळेल
थकवा आणि अतितृष्णा उपाय
जिरेयुक्त औषधी दूध
शरीराचा थकवा कमी होतो
चहा-कॉफीला आरोग्यदायी पर्याय
गर्भावस्थेतील मळमळ कमी होण्यास मदत मिळते
(वैद्यकीय सल्ल्याने सेवन करावे)
खोकला आणि कफ उपाय
जिरे आणि खडीसाखर
कफयुक्त खोकला कमी होण्यास उपयोगी
कफ पातळ होऊन बाहेर पडण्यास मदत मिळेल
नैसर्गिक कफोत्सारक
सकाळी उपाशीपोटी
सकाळी उठल्यावर काहीही न खाता कोमट जिरे पोणी घेतल्यास रात्री साचलेला आम पचण्यास मदत मिळते
जठराग्नी सौम्यपणे जागृत होतो
पोटातील जडपणा, फुगवटा आणि आळश कमी होतो
सकाळी उपाशीपोटी जिरे पाणी कसं घ्यावं?
जिरे पाणी घेण्याच्या दोन्ही पद्धती योग्य आहेत. मात्र कोणीत पद्धत घ्यायची हे प्रकृती प्रकार आणि उद्देशावर अवलंबून असतं.
पद्धत 1 : रात्री भिजवलेले जिरे,सकाळी करावे सेवन
सेवन कसं करावं?
रात्री अर्धा ते एक चमचा जिरे
एका ग्लास पाण्यात भिजवून ठेवावे
सकाळी तेच पाणी कोमट करून सेवन करावे
उपाशीपोटी घेतल्यास परिणाम अधिक चांगला दिसतो
सेवनानंतर किमान
20-30 मिनिटे काहीही खाऊ नये
(नक्की वाचा: Health News: नाश्त्यात अंडे खावे, अंडे खाल्ल्याने वजन वाढते की घटते? डॉक्टरांनी 9 प्रश्नांची दिली उत्तरं)
पद्धत 2 : सकाळी उकळलेले जिरे पाणी
कधी उपयुक्त?
पोटात गॅस, फुगवटा जास्त असल्यास, जठराग्नी मंद असल्यास, कफप्रधान प्रकृतीत, वजन नियंत्रणासाठी आणण्यासाठी उपयुक्त
कशी घ्यावी?
½ ते 1 चमचा जिरे एक ग्लास पाण्यात घालावे
पाच ते सात मिनिटे उकळावे
पाणी कोमट झाल्यावर सेवन करावे
ही पद्धत थोडी उष्ण असून अग्निदीपनासाठी अधिक परिणाम आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
