Happy Diwali 2025 Wishes In Marathi: हिंदू धर्मामध्ये दीपोत्सवास अतिशय महत्त्व आहे. धनत्रयोदशीपासून ते बलिप्रतिपदेपर्यंत (पाडवा) दिवाळी सण उत्सवात साजरा केला जातो. दिवाळी सण म्हणजे अंधारावर प्रकाशाचा, दु:खावर आनंदाचा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानलो जातो. या सणामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण असते. प्रत्येक घरासमोर रांगोळी, दिव्यांची सुंदर सजावट पाहायला मिळते. दिवाळी सणानिमित्त प्रियजनांना खास मेसेज नक्की पाठवा...
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Diwali 2025 | Happy Diwali 2025 Wishes In Marathi
1. दिव्याच्या प्रकाशाने उजळो तुमचं जीवन
सुख-शांती लाभो अपार
गोडवा असो नात्यामध्ये सदा
दिवाळी घेऊन येवो आनंद
2. आनंदाचे फटाके फोडा
उत्सवाचे चैतन्य
सर्वत्र असो प्रेमाचे वातावरण
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
3. गोड-गोड फराळाची लज्जत
नात्यांची जपलेली गोडी
प्रेम आणि आपुलकीची भेट
हीच दिवाळीची खरी ओळख!
Happy Diwali 2025!
4. आकाश कंदिलात रंग असो
मातीच्या दिव्यात तेज असो
तुमच्या आयुष्यातही अशीच
प्रगतीची दिवाळी उजळून निघो!
शुभ दीपावली 2025!
5. लक्ष्मीचे पाऊल तुमच्या दारी
समृद्धी असो तुमच्या घरी
प्रेम, समाधान नांदो जिथे
तिथेच खरी दिवाळी भरते!
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
6. फुलबाज्या, भुईचक्र आणि रांगोळीची सजावट
मिठाई, गोड फराळ आणि दिव्यांचा थाट
आनंदात साजरी करा दिवाळी
तुमच्या आयुष्यात येवो भरभराट!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
7. सण साजरे होतात दरवर्षी
पण दिवाळीची मजा काही वेगळीच
प्रेमाने साजरा करा प्रत्येक क्षण
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
8. दिव्यांचा सण आला
प्रकाशाचा दरवळ सगळीकडे पसरला
तुमच्या आयुष्यात प्रकाशच प्रकाश राहो
सुख-शांतीचा काळ दीर्घ वेळ नांदो!
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
9. लखलखते दिवे, झगमगते आकाश
तुमचे जीवनही होवो असेच प्रकाशमान
सर्व इच्छा होवो पूर्ण
दिवाळीच्या अनंत शुभेच्छा!
10. सुगंधी अत्तरासारखं आयुष्य दरवळो
प्रेम, यश, आनंदाने व्यापलेले जीवन असो
हीच प्रार्थना दिवाळीच्या निमित्ताने
तुमच्या घरात सदैव सुख नांदो!
Shubh Deepawali 2025
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)