
Happy Eid Ul Fitr 2025 Wishes : ईद उल फितर या सणास मिठी ईद (Meethi Eid) असेही म्हटले जाते. रमजानचे दिवस पूर्ण झाल्यानंतर ईद साजरी केली जाते. रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये रोजा ठेवला जातो आणि यानंतर शव्वालचा चंद्र दिसल्यानंतर ईद साजरी केली. ईदच्या दिवशी नमाज पठण केले जाते. घरामध्ये गोड पदार्थांची मेजवानी असते. ईद मुबारकच्या शुभेच्छा (Eid Mubarak) देऊन सण जल्लोषात साजरा केला जातो. प्रियजनांना भेटून ईद साजरी करणे शक्य नसल्यास तुम्ही त्यांना मेसेजद्वारे ईद मुबारकच्या (Eid Ul Fitr Messages) शुभेच्छा देऊ शकता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रमजान ईदच्या शुभेच्छा (Happy Eid Ul Fitr 2025 Wishes In Marathi)
1. ईदचा आनंद द्विगुणित होवो!
ईद म्हणजे आनंदाचा, प्रेमाचा आणि एकतेचा सण!
या मंगलमय दिवशी तुमच्या हृदयात सुख-समाधान, कुटुंबात सौहार्द आणि आयुष्यात भरभराट नांदो.
ईद मुबारक!
Happy Eid Ul Fitr 2025
2. स्नेहाचा, सौहार्दाचा सण!
ईद म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा
गरजूंना मदतीचा हात देण्याचा
आणि जीवनात प्रेमाची उधळण करण्याचा सण!
ही ईद तुमच्यासाठी मंगलमय आणि सुखदायी ठरो!
ईद मुबारक!
3. ईद आणि नव्या सुरुवातीच्या शुभेच्छा!
पवित्र रमजाननंतर येणारी ही ईद तुम्हाला नव्या संधी, भरभराट आणि आनंद घेऊन येवो.
सर्वांना प्रेमाने एकत्र बांधणारा हा सण तुमच्या जीवनात सुख-समृद्धी घेऊन येवो.
ईद मुबारक!
Happy Eid Ul Fitr 2025
4. मानवता आणि प्रेमाचा संदेश!
ईद म्हणजे भुकेल्यांना अन्नदान करण्याचा, दुःखी मनांना सुख देण्याचा आणि गरीबांना आधार देण्याचा सण!
या दिवसाची खरी महती याच गोष्टीत आहे.
ईद मुबारक!
Happy Eid Ul Fitr 2025
5. ईदच्या मंगलमय शुभेच्छा!
ही ईद तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना अपार आनंद, उत्तम आरोग्य आणि भरभराटीचे जीवन देणारी ठरो.
ईद मुबारक!
Happy Eid Ul Fitr 2025

Photo Credit: PTI
6. सुख-समृद्धी लाभो!
पवित्र रमजाननंतर येणारी ही ईद तुम्हाला भरभराटीचे दिवस देणारी ठरो.
तुमच्या घरात आणि मनात सकारात्मकता, प्रेम, समाधान नांदो.
ईद मुबारक!
Happy Eid Ul Fitr 2025
7. ईद म्हणजे प्रेमाची उधळण!
ईद हा सण आपल्याला प्रेम, बंधुता आणि क्षमाशीलतेचं महत्त्व शिकवतो.
हा पवित्र दिवस आपल्या आयुष्यात शांती आणि सौख्य घेऊन येवो.
ईद मुबारक!
Happy Eid Ul Fitr 2025
8. ईदच्या शुभेच्छा! जीवनात चांगले आरोग्य, आनंद आणि समृद्धी लाभो!
ईद मुबारक!
Happy Eid Ul Fitr 2025
9. सर्व मनोकामना पूर्ण होवोत आणि तुम्हाला सदैव यश मिळो! ईद मुबारक!
ईद मुबारक!
Happy Eid Ul Fitr 2025

Photo Credit: PTI
10. ईदच्या या मंगलमय क्षणी प्रेम आणि आनंदाची बरसात तुमच्या जीवनात होवो!
ईद मुबारक!
Happy Eid Ul Fitr 2025
11. ईदचा हा सण एकमेकांसोबत आनंद वाटण्याचा!
जीवनात सौहार्द आणि मैत्री वृद्धिंगत होवो!
ईद मुबारक!
Happy Eid Ul Fitr 2025
(नक्की वाचा: Saugat-e-Modi: ईदचे गिफ्ट 'सौगात ए मोदी किट', 32 लाख मुस्लिम बांधवांना फायदा, काय आहे योजना?)
12. ईदच्या पवित्र दिवशी तुमच्या जीवनात सुख-समृद्धी आणि समाधान लाभो!
ईद मुबारक!
Happy Eid Ul Fitr 2025
13. रमजानच्या उपवासाचा संकल्प आणि त्याचं फळ, ही ईद तुमच्यासाठी आनंदाची ठरो!
ईद मुबारक!
Happy Eid Ul Fitr 2025
14. ईद हा केवळ आनंदाचा नाही, तर एकमेकांना मदतीचा हात देण्याचा सण आहे!
ईद मुबारक!
Happy Eid Ul Fitr 2025
15. ईदच्या (Eid Ul Fitr Wishes) निमित्ताने सर्व दुःख विसरून एकत्र येऊया आणि आनंद साजरा करुया.
ईद मुबारक!
Happy Eid Ul Fitr 2025

Photo Credit: PTI
16. ईदच्या शुभेच्छा! अल्लाह तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान देऊ दे!
ईद मुबारक!
Happy Eid Ul Fitr 2025
17. ईद (Eid Ul Fitr) म्हणजे दानधर्म, प्रेम आणि कुटुंबासोबत साजरा केलेला आनंद!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ईद मुबारक!
Happy Eid Ul Fitr 2025
18. पाहा ईदचा सण आला, जेव्हा चंद्र दिसला
आनंदाचे क्षण घेऊन ईद-उल-फ़ितर आला
ईद मुबारक!
Happy Eid Ul Fitr 2025
19. नेहमी फुलांप्रमाणे हसत राहा
सर्व दुःख विसरुन जा
चहुकडे नांदो फक्त आनंद
सणाच्या उत्साहात सर्वजण होऊया बेधुंद
ईद मुबारक!
Happy Eid Ul Fitr 2025
20. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो
तुमचे नशीब खूप उज्ज्वल होवो
तुमच्या सर्व प्रार्थना कबुल होवो
ईद मुबारक!
Happy Eid Ul Fitr 2025
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world