Ganesh Chaturthi 2025 Wishes: मोदकासारखी गोडी, दुर्व्यासारखी शुद्धता आयुष्यात असो! गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

Happy Ganesh Chaturthi 2025 Wishes In Marathi: गणरायाचे जल्लोषात आगमन करा आणि प्रियजनांना गणेश चतुर्थीच्या खास शुभेच्छा नक्की पाठवा.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Happy Ganesh Chaturthi 2025 Wishes In Marathi: श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा"

Happy Ganesh Chaturthi 2025 Wishes In Marathi: हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थी हा सण अतिशय भक्तिभावाने साजरा केला जातो. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेशोत्सवास जल्लोषात शुभारंभ केला जातो. गणराय म्हणजे विघ्नहर्ता, बुद्धीचा दाता आणि मंगलमूर्ती. प्रत्येक महत्त्वाच्या कार्याची गणपतीच्या पूजेने सुरुवात केली जाते. अशा या आपल्या प्रिय देवतेचा सण भक्ती, श्रद्धा, उत्साह आणि एकोप्याचे प्रतीक मानले जाते. गणेश चतुर्थीनिमित्त मित्रपरिवार, नातेवाईकांसह प्रियजनांना खास शुभेच्छा नक्की पाठवा. 

श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!| Happy Ganesh Chaturthi 2025 Wishes In Marathi| Ganesh Chaturthi 2025 Wishes In Marathi

1. विघ्नहर्ता आला गजर करत
मोरया मोरया म्हणताना हृदय भरुन येते
सुख-समृद्धीचे दान तो ओंजळी देतो
घरोघरी मंगल गंध दरवळतो 
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

2. मातीच्या मूर्तीत देव भेटतो
घराघरांत वाजतात ढोल-ताशे
गणपती बाप्पा मोरया हाच जय जयकार
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

3. विघ्नांचा राजा आला सुख घेऊन
आशेच्या किरणांनी मन सजवून
मोडून टाको सर्व चिंतांचा फास
देवो बाप्पा सर्वांना आपुलकीचा सुवास!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

4. साजिरी ही चतुर्थी प्रेमाची
मनात जपली आस विश्‍वासाची 
मोडू दे वाईट सारे स्वप्न
देवो नवे यश नि उत्तम सत्व!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Advertisement

5. गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातील सर्व संकटं दूर करो
सुख, शांती आणि समृद्धी तुमच्यावर सदैव राहो
बुद्धी, विवेक आणि प्रेरणा लाभो अशी श्रींच्या चरणी प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

6. गणराजाची आरती, मोदकांचा नैवेद्य
सजलेले मखर आणि भक्तीभाव 
तुमचे जीवन उजळून निघो!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

7. श्री गणेशाचे आगमन 
तुमच्या जीवनात नवीन उमेद
नवीन संधी आणि यश घेऊन येवो
सर्व विघ्न दूर होवो आणि आनंद फुलो 
गणपती बाप्पा मोरया!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Advertisement

8. बाप्पा येतात दरवर्षी
सुख आणि समाधान घेऊन 
तुमच्या आयुष्यातही बाप्पाचे आगमन
आनंद आणि भरभराट घेऊन होवो 
गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा! 

9. सजवलेली आरास, मखर आणि दिव्यांची रोषणाई
हे सर्व पाहून मन प्रसन्न होते
तुमच्या घरातही बाप्पाचे पाऊल पडो
आणि तुमचं आयुष्य मंगलमय होवो
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Advertisement

10. श्रीगणेश म्हणजे शुभारंभाचं प्रतीक
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नवीन वाटचालीचा आरंभ
श्रींच्या आशीर्वादाने सफल होवो
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

(नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2025: श्री गणेशाची 108 नावं उच्चारुन दुर्वा अर्पण करा, गणरायाकडून मिळतील मोठे लाभ)

11. बुद्धीचे दाता, विघ्नहर्ता श्रीगणेशा
तुमचे जीवन आनंदमय करो
मोदकासारखी गोडी 
दुर्व्यासारखी शुद्धता तुमच्या आयुष्यात असो
गणपती बाप्पा मोरया!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

12. श्रीगणेशाचे आगमन म्हणजे आनंदाचा सण
तुमच्या घरात आणि मनात
सदैव बाप्पाची कृपा लाभो
जीवनात नवनवीन यश प्राप्त होवो
श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

13. श्रीगणेशा तू बुद्धीचा राजा 
तुझ्या कृपेने आमच्या जीवनातही प्रकाश येवो 
प्रत्येक अडचण सहजतेने पार होवो 
गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!

14. गणेशोत्सव ही श्रद्धा आणि भक्तीची गंगा 
तिच्या प्रवाहात मन न्हाऊन निघो
तुमचे जीवनही भक्तिभावाने उजळून जावो
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

15. बाप्पा येतात घरात
सुख, समाधान, आनंद घेऊन
तुमचं घरही बाप्पाच्या आशीर्वादाने
सदैव मंगलमय राहो
श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

16. मोदकांची गोडी, बाप्पाची ओळख
दहा दिवसांचा उत्सव आणि भक्तिभावाचं वातावरण 
हीच खरी गणेश चतुर्थीची शान!
उत्साहात साजरा करा हा आनंदोत्सव!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

17. श्रींचा मखर सजवा भक्तिभावाने
आरती म्हणा आनंदाने
काही क्षण भक्तीत रमवा मनापासून
आणि जीवनात शांती अनुभववा
गणपती बाप्पा मोरया!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

18. विघ्नहर्त्याचा आशीर्वाद घेऊन
सर्व विघ्न टाळा आणि
सदैव यशस्वी व्हा हीच श्री चरणी प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

19. गणराजाच्या उपस्थितीने घरात सकारात्मकता नांदो
प्रत्येक दिवस नव्या ऊर्जेने भरलेला असो!
श्री गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

20. गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यात 
प्रेम, शांतीचा वर्षाव करो
सर्वांचे मन जिंकणाऱ्या या उत्सवात
तुमचे मनही आनंदित होवो!
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)