Independence Day 2024: 15 ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिवस. 1947 साली याच तारखेला आपल्या भारत देशाल स्वातंत्र्य मिळाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही देशवासीयांनी आठवडाभरापूर्वीचा स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. यानिमित्ताने स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानास, देशाकरिता त्यांनी दिलेल्या लढ्याचे आणि क्रांतिकारकांच्या शौर्याचे स्मरण केले जाते. शाळा, महाविद्यालय, सोसायटी, सरकारी तसेच खासगी कार्यालयांमध्ये उत्साहामध्ये आपला स्वातंत्र्य दिन (Happy Independence Day 2024 Wishes) साजरा केला जातो. देशभक्तीपर गीतांचेही सादरीकरण केले जाते. आपल्या देशातील प्रत्येक नागरिक एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा (Happy Independence Day 2024 Messages) देऊन हा दिवस उत्साहात साजरा करतो. तुम्हाला देखील मित्रपरिवार, नातेवाईकांना 15 ऑगस्ट शुभेच्छा पाठवायचे असतील खालील शुभेच्छा संदेश नक्कीच तुमच्यासाठी उपयोगी ठरतील. तसेच हे संदेश (Happy Independence Day 2024 Images) तुम्ही आपल्या व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम स्टेटसमध्येही ठेवू शकता.
Photo Credit: Canva
स्वातंत्र्य दिवस 2024 मेसेज | Happy Independence Day 2024 Messages
तीन रंगांनी मिळून तयार झालेला हा ध्वज आहे आपल्या देशाची शान
प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान
याच भूमीत आहे गंगा आणि हिमालयीन पर्वत रांगा
तीन रंगांमध्ये रंगलेला हा आहे आमचा हिंदुस्थान
आहे आम्हा सर्वांचा मान
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Independence Day 2024
कायम राहो आमच्या देशाची शान
देशाचे आम्ही आहोत रक्षक
देशासाठी जीवन करू अर्पण
आमच्या नसानसांत भिनलीय देशभक्ती
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Independence Day 2024
Photo Credit: Canva
देशासाठी त्याग करणाऱ्यांची आहे ही भूमी
ज्या मातीत भगतसिंग यांचा झाला जन्म
त्या भारतमातेची आम्ही आहोत लेकरं
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Independence Day 2024
स्वातंत्र्याचा उत्सव करतोय साजरा
आज आमची ईद-दिवाळी आणि आजच आहे आमची होळी
तीन रंगांनी सजलेला आमचा देश
तिरंगा आहे आम्हाला प्राणाहुनही प्रिय
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Independence Day 2024
Photo Credit: Canva
ओसाड धरतीवरही फुलवू फुलांची बाग
या धरतीलाच बनवूया स्वर्ग
चला सर्वांनी गळाभेट घेऊन
साजरा करूया स्वातंत्र्याचा उत्सव
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Independence Day 2024
स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाची गाथा
शूरवीरांनी घडवली क्रांती
भूमीसाठी दिले बलिदान
घाबरले नाहीत, झुकले नाहीत
स्वातंत्र्यासाठी पत्करले वीरमरणही
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Independence Day 2024
Photo Credit: Canva
जगभरात लई भारी माझा देश
या देशासाठी माझ्या शंभर जन्माचाही करेन त्याग
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Independence Day 2024
Photo Credit: Canva
माझ्या देशाची, राष्ट्रध्वजाची शान
तिरंग्याचे मनात आहे कायम स्थान
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Independence Day 2024