Happy International Friendship Day 2025: आयुष्यामध्ये अनेक नाती येतात आणि जातात, काही लोक रक्ताच्या नात्याने जोडलेले असतात तर काही लोक केवळ ओळखीने आयुष्यभरासाठी आपली होतात. या सर्व नात्यांमध्ये एक नाते असे असते जे कोणत्याही स्वार्थाशिवाय जुळते आणि केवळ विश्वास-प्रेम-आपुलकीवर टिकून असते - ते नाते म्हणजे मैत्री. मैत्रीचे नाते (Happy International Friendship Day 2025 Wishes) निस्वार्थी आणि सच्चे असते. दरवर्षी 30 जुलैला जगभरात आंतरराष्ट्रीय मैत्री दिन (Happy International Friendship Day 2025) साजरा केला जातो. तुम्ही देखील तुमच्या मित्रमैत्रिणींना आंतरराष्ट्रीय मैत्री दिनानिमित्त खास मेसेज पाठवायला विसरू नका.
आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! (International Friendship Day 2025 In Marathi)
1. मैत्री म्हणजे मनापासून जपलेले नाते
ना अपेक्षा, ना कारण, ना व्यवहार
फक्त निखळ प्रेम आणि समजूतदारपणा
आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
International Friendship Day 2025!
2. जगातली बहुतांश सर्व नाती स्वार्थासाठी असतात
पण एकच नातं असं आहे जे मनापासून जपलं जातं ते म्हणजे मैत्रीचे नाते
तुझ्यासारखा मित्र मिळाल्याने आयुष्य सुंदर वाटतंय
आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
International Friendship Day 2025!
3. कधी रुसवे, कधी हसवे
कधी मनातले बोलून टाकणे
तर कधी शांतपणे समजून घेणे
हेच असते सच्च्या मैत्रीचे नाते
आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
International Friendship Day 2025!
4. तुझ्यासारखा मित्र म्हणजे देवाचे वरदान
जेव्हा सर्व जग दूर जाते
तेव्हा तू जवळ उभी राहतेस
आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
International Friendship Day 2025!
5. जीवनात खूप लोक भेटतात
पण काही जण हृदयामध्ये पक्के घर करतात
तू माझ्यासाठी तसाच एक खास मित्र आहेस
आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
International Friendship Day 2025!
6. तू सोबत असलास की आयुष्याची वाट सोपी वाटते
प्रत्येक दुःख, संकट तू हसत दूर करण्यास मदत केलीस
त्यासाठी मनापासून धन्यवाद
आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
International Friendship Day 2025!
7. मित्र म्हणजे आनंदाचा खजिना
कधी हसवतो, कधी रडवतो, पण नेहमीच साथ देतो
तुझ्या मैत्रीला मनापासून सलाम
आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
International Friendship Day 2025!
8. तुझ्याशिवाय ही दुनिया वाटते अपूर्ण
मित्र असावा तर तुझ्यासारखा
जो प्रत्येक क्षणी न सांगता साथ देतो
आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
International Friendship Day 2025!
9. मैत्री म्हणजे केवळ एक नाते नव्हे
ती आहे एक भावना
जी मनामनात जुळलेली असते
तुझ्या माझ्या मैत्रीच्या सुंदर नात्याला सलाम
आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
International Friendship Day 2025!
10. कधी शब्दांपेक्षा शांततेत प्रेम दिसते
तर कधी हास्याच्या मागे दुःख लपलेले असते
पण खरी मैत्री तीच असते
जी अशा प्रत्येक क्षणी हसवते आणि साथ देते
आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
International Friendship Day 2025!
11. तुझी मैत्री म्हणजे माझ्यासाठी खूप मोठे बळ आहे
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तू साथ दिली आहेस
हे ऋण कधीही न फेडता येणारे असे आहे
आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
International Friendship Day 2025!
12. खरी मैत्री म्हणजे गरज नसतानाही आठवण ठेवणे
मिळालेल्या वेळेत सोबत राहणे
आणि हक्काने रुसणे-फुगणे
अशा या नात्याला माझा सलाम
आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
International Friendship Day 2025!
13. सुखामध्ये तर सर्व सोबत असतात
पण दुःखामध्ये जो खंबीरपणे उभा राहतो
तोच खरा मित्र…
आणि माझ्यासाठी तू तोच आहेस!
आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
International Friendship Day 2025!
14. मैत्री ही वेळ, अंतर, आणि परिस्थितीवर अवलंबून नसते
ती फक्त मनापासून जपायची असते
आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
International Friendship Day 2025!
15. मित्र म्हणजे हसवणारा
समजून घेणारा
रुसवा घालवणारा
नेहमीच साथ देणारा
तुझ्यासारखा!
आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
International Friendship Day 2025!
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)