Happy National Daughter's Day 2025 Wishes: मुलगी म्हणजे सर्वात मोठे वरदान, कन्या दिनाच्या पाठवा खास शुभेच्छा

Happy National Daughter's Day 2025 Wishes: राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त मित्रपरिवारासह प्रियजनांना खास शुभेच्छा नक्की पाठवा.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Happy National Daughter's Day 2025 Wishes: कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

Happy National Daughter's Day 2025 Wishes And Quotes: मुलगी ही प्रत्येक कुटुंबाची शान असते. घरामध्ये मुलगी जन्माला आली की लक्ष्मी आली, असे म्हणतात. भारतात दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी कन्या दिवस (National Daughter's Day) साजरा केला जातो. मुलींचे कौतुक करण्यासाठी, त्यांना सक्षम करण्याची आठवण करुन देण्यासाठी तसेच समाजामध्ये समानतेबाबत जागरुकता व्हावी, यासाठी राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. डॉटर्स डे 2025 निमित्त प्रियजनांना या खास शुभेच्छा नक्की पाठवा.

राष्ट्रीय कन्या दिवस| राष्ट्रीय कन्या दिन| हॅपी डॉटर्स डे 2025 | Happy National Daughter's Day | National Daughter's Day 2025 

1. तुझ्या हास्याने घर उजळते
तुझ्या स्पर्शाने दुःख विरते
तू आहेस आयुष्याचं गाणं 
मुलगी म्हणजे देवाचे दिलेले मोठे वरदान
राष्ट्रीय कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
National Daughters Day 2025

2. तुझं अस्तित्व आहे खास 
तुझ्यामुळेच घरात हसरा प्रकाश 
तू आहेस माझा अभिमान 
Happy Daughter's Day बाळ
National Daughters Day 2025

3. लाडकी लेक म्हणजे फुलांचा साज
तिच्याशिवाय घराला नसते घरपण 
तू घरातली परी 
तुझा प्रत्येक दिवस खास असावा
हाच आशीर्वाद
National Daughters Day 2025

Advertisement

Photo Credit: Canva

4. शब्द अपुरे पडतील तुझे वर्णन करायला 
मन हरवून जातं तुला पाहताना 
दिवस आज तुझा खास आहे 
माझ्या लेकरा, तुला लाख-लाख शुभेच्छा!
National Daughters Day 2025

(नक्की वाचा: Daughters Day 2025: मुली वडिलांच्या जास्त लाडक्या का असतात? संशोधकांनी सांगितलं खास कनेक्शन)

5. तू घराची गोड कविता
तुझ्याशिवाय अधुरी कहाणी 
तुझ्यावर सर्वांचं आहे प्रेम अपार 
Daughter's Dayच्या खास शुभेच्छा 
Happy National Daughters Day 2025

Advertisement

6. तू आलीस आणि घर फुललं
तुझ्यामुळे जीवन रंगत गेलं
तुझं अस्तित्व असो सदैव सुगंधित, याच शुभेच्छा!
Happy Daughter's Day 

Photo Credit: Canva

7. नाजूक मन आणि प्रेमळ हसू
तुझ्यामुळेच आमचा प्रत्येक दिवस खास 
सदा हसत रहा, आनंदात रहा
कारण बेटी, तूच आमची जगण्याची दिशा!
Happy National Daughters Day 2025

8. तुझं अस्तित्व फुलासारखं नाजूक
पण मन पर्वतासारखं मजबूत
तू आहेस माझी प्रेरणा,
Daughter's Day ला तुला मनापासून शुभेच्छा !

Photo Credit: Canva

9. तुझ्या पावलांनी घर गंधाळलं
प्रत्येक क्षणी तुझ्यामुळे आहे सुख-आनंद
तुझ्यामुळेच आमच्या आयुष्याला अर्थ
Daughter's Dayच्या हार्दिक शुभेच्छा 

10. सजग, हुशार आणि नाजूक तू
घरातली गोड आठवण तू
सदैव नांदो तुझं आयुष्य फुलांसारखं,
Daughter's Day ला तुला अनेक आशीर्वाद !

Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)