Teachers' Day 2025 Card: शिक्षक दिन स्पेशल ग्रीटिंग कार्डवर लिहा हे खास संदेश, शिक्षकांना होईल मोठा आनंद

Teachers Day 2025 Card Message: शिक्षक दिनी शाळकरी विद्यार्थी स्वतःच्या हाताने त्यांच्या शिक्षकांसाठी ग्रीटिंग कार्ड तयार करून देतात. कार्डवर नेमके काय लिहावे, हे कळत नाहीय का? मग हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Teachers Day 2025 Greeting Card: टीचर्स डेनिमित्त ग्रीटिंग कार्ड कसे तयार करावे?"

Happy Teachers' Day 2025: शिक्षकांप्रति आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षक दिनानिमित्त शाळांमध्येही विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शिक्षक दिनी काही शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षक होऊन जातात आणि वर्गातील मुलांना शिकवतात. तसेच शिक्षकांचे आभार मानण्यासाठी विद्यार्थी शिक्षकांना ग्रीटिंग कार्ड आणि भेटवस्तू देखील देतात. शिक्षक दिनानिमित्त तयार केलेल्या कार्डवर नेमके काय लिहावे, हे कळत नाहीय का? तर चिंता करू नका. या लेखातील मेसेज तुम्ही कार्डमध्ये नमूद करू शकता. ज्यामुळे शिक्षकांना नक्कीच आनंद होईल.  

शिक्षक दिनानिमित्त खास मेसेज | Happy Teachers Day 2025 Card Message | Happy Teachers Day 2025 Wishes

1. जीवनाच्या प्रत्येक अंधारात 
प्रकाशाचा मार्ग दाखवता तुम्ही
बंद झाल्या सर्व वाटा 
तर नवीन रस्ता दाखवता तुम्ही 
केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर 
जीवन जगणे शिकवता तुम्ही
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

2. माझ्यासारख्या शून्य व्यक्तीला 
शून्याचे मोल समजावून सांगितलं 
प्रत्येक अंकापुढे शून्य जोडला 
तर त्याचे किती मोठं महत्त्व आहे
हे तुमच्यामुळे कळलं
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

3. ज्ञानाचा खजिना तुम्ही दिला 
भविष्याचा सामना करण्यासाठी मला तयार केले
तुमच्या उपकाराबाबत 
कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे नाहीत शब्द
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

Advertisement

4. जे आपल्याला माणूस म्हणून घडवतात
चूक - बरोबर यातील फरक सांगतात
त्या सर्व शिक्षकांना माझा प्रणाम
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

5. ते आपल्याला प्रत्येक अक्षर शिकवतात 
प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगतात
कधी प्रेमाने, कधी ओरडून  
जीवन कसे जगायचे हे शिकवतात 
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

Advertisement

6. तुम्ही माझ्या आयुष्याची प्रेरणा आहात 
तुम्ही मला नेहमीच सत्य आणि शिस्तीचे धडे दिले आहेत 
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

7. शिक्षणापेक्षा मोठे वरदान नाही
गुरूंचे आशीर्वाद मिळवा
यापेक्षा मोठा सन्मान नाही
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

8. अंधारात मला प्रकाश मिळाला 
जगातील दुःख, संकटांविरोधात मला लढा देण्यास बळ मिळाले
गुरुंनी मला मोठे आशीर्वाद दिले
गुरुंनी मला एक चांगला माणूस म्हणून घडवले
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

9. शिक्षकाच्या करुणेमुळेच आपल्याला ज्ञानाचा खजिना मिळतो
गुरुमध्ये संपूर्ण जग मिळते
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

10. शिक्षक जगण्याची कला शिकवतात
शिक्षक आपल्याला ज्ञानाचे मूल्य सांगतात
केवळ पुस्तकं असणे काही उपयोगाचे नव्हे
कारण कठोर परिश्रमाने शिक्षण देतात शिक्षक
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

Advertisement

11. गुरुशिवाय ज्ञान कुठे मिळते
गुरुंमुळे जग ओळखणे शक्य होते
गुरुंमुळे जीवनाला शिस्त येते
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)