जाहिरात

Hartalika Tritiya 2025 Vrat: हरितालिका तृतीयेच्या व्रताचे महत्त्वाचे नियम, एकाही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका

Hartalika Tritiya 2025 Vrat Rules: हरितालिका तृतीया व्रताचे महत्त्वाचे नियम माहिती आहेत का?

Hartalika Tritiya 2025 Vrat: हरितालिका तृतीयेच्या व्रताचे महत्त्वाचे नियम, एकाही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका
"Hartalika Tritiya 2025 Vrat Rules: हरितालिका तृतीया व्रताचे नियम माहीत आहेत का?"

Hartalika Tritiya 2025 Vrat Rules: गणेशोत्सवास शुभारंभ होण्यापूर्वी दरवर्षी हरितालिका तृतीया साजरी केली जाते. यंदा हरितालिका तृतीया 26 ऑगस्ट रोजी आहे. भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीया तिथीला हरितालिका तृतीयेचा (Hartalika Teej 2025) उपवास केला जातो. या उपवासचे काही महत्त्वपूर्ण नियम या लेखाद्वारे जाणून घेऊया...

हरितालिका तृतीया व्रताचे महत्त्वाचे नियम | Hartalika Tritiya 2025 Vrat Rules

1. हरितालिका तृतीयेचे व्रत सुवासिनी आणि कुमारिका करतात.
2. हरितालिका व्रताची देवता पार्वती देवी आहे. ही देवी म्हणजेच आदिशक्ती सर्व मांगल्याचे प्रतीक मानले जाते. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते. 
3. घरामध्ये पूजा करण्यासाठी प्रथम जागा स्वच्छ करावी. चौरंग अथवा पाट पूर्वी किंवा पश्चिम दिशेला मुख करून बसता येईल, अशा पद्धतीने मांडवा. चौरंगाखाली स्वस्तिक चिन्हांकित करावे आणि चौरंगाभोवती रांगोळी देखील काढवी. 
4. चौरंगावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यामधोमध शिवलिंग, उजव्या बाजूला गौरी आणि डाव्या बाजूला सखी या मूर्ती ठेवाव्या. गौरीजवळ गणपती म्हणून सुपारी ठेवावी. चौरंगाच्या दोन्ही बाजूला विडे ठेवावे.   
5. चौरंगाच्या चारही बाजूंना केळीचे खांब बांधावे. डाव्या बाजूला पूजेचा तांब्या ठेवावा. 
6. पूजा करताना मथ्येच उठावे लागू नये, यासाठी पूजा साहित्य स्वतः जवळ आणून ठेवावे. 
7. पारंपरिक पेहराव परिधान करुन हळदकुंकू लावू घ्यावे. देव, वडीलधारी मंडळी आणि गुरुजींना नमस्कार करुन पूजेला बसावे. 
8. प्राणप्रतिष्ठेनंतर उत्तरपूजा होईपर्यंत मूर्ती हलवू नये. मूर्ती मातीच्या असल्यामुळे पूजेचे उपचार हळुवारपणे करावे. 
10. मूर्तीवर फुले उडवू नये. हळूवारपणे फुले अर्पण करावी, देवीवर पाणी फुलाने शिंपावे.

(नक्की वाचा: Hartalika Tritiya 2025 Date: हरितालिका तृतीया कधी आहे? तिथी, शुभ मुहूर्त, पूजेची मांडणी, आरती-कथा सर्व माहिती)

11. देवाला अनामिकेने गंध लावावे. कुंकू, अक्षता उजव्या हाताची अनामिका, मधले बोट आणि अंगठाच्या चिमटीने वाहाव्यात.
12. विड्याची पाने उताणी आणि देठ देवीकडे करून देवीसमोर ठेवावी. त्यावर सुपारी ठेवावी.  शेंडी देवीकडे करुन श्रीफळ ठेवावे. 
13. देवीच्या उजव्या बाजूला घंटा, डाव्या बाजूला समई आणि तुपाचा दिवा (निरांजन) उजव्या बाजूला ठेवावा. उदबत्ती निरांजनाजवळ ठेवावी. 
14. पूजेला प्रारंभ करताना समई प्रज्वलित करावी. निरांजनही प्रज्वलित करावे. यानंतर कापूर आरती ओवाळावी.  
15. श्री हरितालिका व्रत कथा वाचावी. त्याचा इतरांनाही लाभ घेऊ द्यावा.

(नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थी 2025 कधी आहे? जाणून घ्या पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि विसर्जनाची तारीख)

16. आरती म्हणावी. त्यानंतर देवीला नैवेद्य अर्पण करावा. पूजा करणाऱ्या भगिनींनी संपूर्ण दिवस उपोषण करावे. पाणीसुद्धा पिऊ नये. रात्री जागरण करावे.
17. पूजेनंतर पार्वतीच्या नावाने एका सुवासिनीची खणानारळाने ओटी भरावी.  
18. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तरपूजा होईपर्यंत समई प्रज्वलित असणे आवश्यक आहे. 
19. उत्तरपूजेनंतर हरितालिकेच्या मूर्ती, देवीवर वाहिलेली फुले, पत्री समुद्रात किंवा नदीत अथवा तळ्यात विसर्जित कराव्या.
20. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तरपूजा करून व्रताचे पारणे करावे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com