- पानामध्ये असलेले क्लोरोफिल आणि अँटीफंगल गुणधर्म तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करतात
- पानाचा आहारात समावेश लड्डू, आईस्क्रीम किंवा शॉट्सच्या स्वरूपातही केला जाऊ शकतो
- पानातील औषधी गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात
Health Benefits of Paan: जेवणानंतर पान खाण्याची परंपरा आपल्याकडे वर्षानुवर्षांपासून आहे. पण तुम्हाला माहित आहे का, हेच पान तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर ठरू शकते? पानामध्ये क्लोरोफिल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करून श्वासाची दुर्गंधी दूर करतात. जर तुम्हाला पान तसेच खायला आवडत नसेल, तर तुम्ही 'पान लड्डू', 'पान आईस्क्रीम' किंवा 'पान शॉट्स'च्या स्वरूपात त्याचा आहारात समावेश करू शकता. गुलकंद आणि बडीशेप सोबत घेतलेले पान शरीराला थंडावा देते. विशेषतः वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी रिकाम्या पोटी पान खाणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
नक्की वाचा - पेरूला हिंदी मध्ये काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहितच नाही
विड्याच्या पानात लपलेले औषधी गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत. पानातील अँटी-डायबिटिक गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करतात. तसेच, मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि मनाला शांती मिळवून देण्यासाठी पानाचा सौम्य उत्तेजक प्रभाव उपयुक्त ठरतो. आपल्याकडे पान खाणारा एक मोठा वर्ग आहे. त्याचे फायदे त्यांनी मिळतात. जेवणानंतर अनेक जणांना पान खाण्याची सवय ही असते.
हिंदी शब्द 'पान' हा मूळ संस्कृत शब्द 'पर्ण' (Parna) पासून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ 'पान' असा होतो. संस्कृतमध्ये 'ताम्बूल' (Tambula) आणि 'नागवल्ली' (Nagavalli) असेही संबोधले जाते. रिकाम्या पोटी पानाचे सेवन केल्याने पचनसंस्था सुधारण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
पानाचे प्रमुख फायदे
- पचन: गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
- ओरल हेल्थ: हिरड्यांची सूज आणि कॅव्हिटीपासून संरक्षण मिळते.
- त्वचा: मुरुमे आणि त्वचेची जळजळ कमी होण्यास मदत होते.
- वजन नियंत्रण: शरीरातील चयापचय क्रिया सुधारते.