- पेरूमध्ये व्हिटॅमिन C, फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात,
- हिंदी भाषेत पेरूला सफरी किंवा जामफल असे म्हणतात, तर अमरूद हा फारसी शब्द आहे, जो मूळ हिंदी शब्द नाही
- पेरूचे नियमित सेवन पचनसंस्था सुधारण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास उपयुक्त ठरते
Guava Name In Hindi: फळं आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जातात. हिवाळ्यात पेरूचे सेवन करण्याचे प्रमाण वाढते. पेरूमध्ये व्हिटॅमिन C, फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. इंग्रजीत याला 'Guava' म्हणतात. तर आपण मराठीत पेरू असं म्हणतो. हिंदीत काही जण पेरूला 'अमरूद' असे म्हणतात. पण हा मूळ हिंदी शब्द नसून तो फारसी आहे, हे फार कमी लोकांना माहित आहे. त्यामुळे पेरूला हिंदीत काय म्हणतात हे आपण जाणून घेणार आहोत.
त्यामुळे पेरूला हिंदीत काय म्हणतात हा प्रश्न तुम्हाला पडला असले. भारतात आपण बोलताना इंग्रजी, हिंदी, फारसी आणि उर्दू शब्दांची सरमिसळ करतो. हिंदी भाषेत पेरूला 'सफरी' (Safri) असे संबोधले जाते. याशिवाय अनेक ठिकाणी याला 'जामफल' असेही म्हटले जाते. अनेकांना पेरूसा हिंदीच अमरूद म्हणतात असं वाटत होतं.पण तो मुळ हिंदी शब्द नाही. सफरी असं हिंदीतून पेरूला संबोधले जाते.
नक्की वाचा - एकदा चार्ज करा 700 किलो मिटर पळवा! भारतात येते अशी भन्नाट कार जिच्यावरून नजर हटणार नाही
पेरू खाण्याचे वेगळेच महत्त्व आहे. पेरू केवळ चवीलाच छान नसून तो पचनसंस्था सुधारण्यासाठी उत्तम आहे. त्यातील फायबरमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. तसेच, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पेरू खाणे फायदेशीर ठरते. त्यामुळे अनेक जण आपल्या आहारात पेरू नेहमी खाताना दिसतात. पेरू आरोग्यासाठी चांगला समजला जातो.
पेरू खाण्याचे फायदे
- पचनशक्ती सुधारते: फायबरमुळे पचन सुलभ होते.
- त्वचेसाठी उत्तम: अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते.
- रोगप्रतिकारशक्ती: थंडीच्या दिवसात होणाऱ्या संसर्गापासून वाचण्यासाठी पेरू मदत करतो.
- हृदय आरोग्य: पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
पेरू कच्चा खाणे सर्वात उत्तम मानले जाते. मात्र, ज्यांना पोटाचे विकार आहेत त्यांनी पेरूच्या बियांचे सेवन जपून करावे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world