Lavang Water Benefits: प्रत्येक भारतीय घरामध्ये आढळणारे लवंग केवळ जेवणाचीच चव वाढवत नाही तर आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर मानले जाते. तुम्ही सुद्धा चेहऱ्यावरील पुरळ (पिंपल्स) आणि मुरुमांनी त्रस्त असाल, महागडे ब्युटी प्रॉडक्ट्स आणि क्रीम्स वापरूनही परिस्थिती बदलत नसेल तर लवंग तुमच्या खूप कामी येऊ शकते. फक्त तुम्हाला रोज रात्री दोन लवंग पाण्यात भिजवून ठेवायच्या आहेत आणि सकाळी उठून उपाशी पोटी हे पाणी प्यायचे आहे. ऐकायला हा खूप साधा सोपा उपाय वाटतो, पण जेव्हा तुम्ही रोज याचा वापर कराल, तेव्हा याचे परिणाम पाहून तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल.
लवंगमधील युजेनॉल
लवंगमध्ये 'युजेनॉल' (Eugenol) नावाचा एक अतिशय शक्तिशाली नैसर्गिक घटक आढळतो. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लमेटरी गुणधर्म असतात. याचा अर्थ असा की, हे थेट त्या बॅक्टेरियाशी लढते, जे चेहऱ्यावर पिंपल्स येण्यास कारणीभूत असतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त क्रीम्ससारखे हे तुमच्या त्वचेच्या वरच्या थराला (Skin Barrier) हानी पोहोचवत नाही.
21 दिवसांचे चॅलेंज घ्या
कमीत कमी 21 दिवस सलग लवंगचे पाणी प्या. 21 दिवसांत तुम्हाला स्पष्ट फरक दिसून येईल.
लवंगेचे पाणी पिण्याचे फायदे
1. निरोगी त्वचा
लवंगच्या पाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स आणि मुरुम हळूहळू कमी करण्यास मदत करते. हे पाणी नियमित प्यायल्यास त्वचा चमकदार होण्यास मदत मिळू शकते.
2. निरोगी पोट
आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या आरोग्याचा आणि त्वचेचा थेट संबंध आपल्या पोटाशी असतो. जर तुमची पचनसंस्था व्यवस्थित नसेल आणि पोटात बिघाड असेल तर त्याचा परिणाम थेट तुमच्या चेहऱ्यावर दिसतो. लवंगचे पाणी शरीराची पचनप्रक्रिया सुधारते. जेव्हा पोट आतून स्वच्छ राहते, तेव्हा त्वचा आपोआप स्वच्छ आणि निरोगी दिसू लागते.
(नक्की वाचा: Acidity Home Remedies: अॅसिडिटीसाठी अँटासिड घेताय? काय करावे आणि काय टाळावे? डॉ. पै यांनी सांगितले सीक्रेट)
3. सर्दी-खोकला
हवामानात बदल होताच सर्दी, खोकला, कोरडा खोकला, घशात खवखव, ताप या समस्या सर्वात जास्त त्रास देतात. लवंगमध्ये असलेले गुणधर्म सर्दी-खोकल्यापासून बचाव करण्यास उपयुक्त ठरतात.
(नक्की वाचा: Sabudana Benefits: साबूदाणा खरंच हेल्दी आहे का? कॅलरी, प्रोटीन, फायबरचे प्रमाण किती असते? ब्लड शुगर-वजनावर काय होतो परिणाम)
4. दातांचे आरोग्य
दातदुखी, हिरड्यांमध्ये वेदना, हिरड्यांना सूज येणे किंवा पायरियाशी संबंधित समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही लवंगचे पाणी पिऊ शकता.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)