Soak Raisins Benefits: सुकामेवा खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते, पण ते योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी खाल्ले तरच अधिक फायदे मिळतील. जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात योग्य पद्धतीने केली तर तुमचे शरीर दिवसभर ॲक्टिव्ह राहील. आयुर्वेदाचार्य आणि योगगुरू डॉ. राम अवतार यांनी सांगितले की, जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाल्ले तर ते तुमच्या आरोग्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी ठरणार नाहीत. अनेकदा लोक सुकामेवा खातात पण मनुका भिजवून खाण्याचे फायदे खूप कमी लोकांना माहिती आहेत. रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाल्ल्यास आरोग्यास कोणते फायदे मिळतील, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
10-15 मनुक्यांमध्ये (सुमारे 20 ग्रॅम) कोणकोणते घटक असतात?
- कॅलरीज: 60 kcal
- कार्बोहायड्रेट्स: 16 g
- फायबर: 1 g
- लोह: 0.35 mg
- पोटॅशियम: 150 mg
रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाण्याचे फायदे
1. पोटाचे आरोग्य
जर तुम्हाला सकाळी पोट स्वच्छ न होणे किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर भिजवलेले मनुके खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. डॉ. राम अवतार यांच्या मते, मनुक्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. रात्रभर भिजवून ठेवलेले मनुके खाल्ले तर ते सहज पचतात.
(नक्की वाचा: Weight Loss Journey: 116 Kg पासून ते 69 Kg पर्यंतचा प्रवास...Fitness Influencerने या 5 सवयींनी घटवलं 47 Kg वजन)
2. रक्ताची कमतरता
मनुक्यामध्ये लोह आणि व्हिटॅमिन-बी कॉम्प्लेक्स चांगल्या प्रमाणात असते. रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाल्ल्याने शरीरात लाल रक्तपेशी (रेड ब्लड सेल्स) वेगाने तयार होतात, ज्यामुळे ॲनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.
3. ऊर्जा
जर तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर मनुक्यांचे सेवन नक्की करा. मनुक्यामध्ये नैसर्गिक साखर (नॅचरल शुगर) असते. त्यामुळे सकाळी मनुके खाल्ल्यानंतर शरीराला लगेच ऊर्जा मिळते.
(नक्की वाचा: Clove Water Benefits: सकाळी रिकाम्या पोटी 21 दिवस लवंगचे पाणी प्यायल्यास काय होईल? जाणून घ्या 4 मोठे फायदे)
4. ब्लड प्रेशर
भिजवलेल्या मनुक्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. पोटॅशियम आपल्या शरीरातील सोडियम म्हणजेच मिठाचा प्रभाव संतुलित करण्यास मदत करते. डॉ. राम अवतार सांगतात की, ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांच्यासाठी सकाळी भिजवलेली मनुका खाणे खूप फायदेशीर ठरू शकते.
मनुका खाण्याची योग्य पद्धत काय आहे?
मनुक्यांपासून संपूर्ण फायदे मिळण्यासाठी ते योग्य पद्धतीने खाणे आवश्यक आहे, असेही डॉ. अवतार यांनी सांगितले.
- किती मनुका घ्यावी- सुमारे 8 ते 10 मनुका घ्या.
- कशी भिजवावी- रात्री एक कप स्वच्छ पाण्यात मनुके भिजत ठेवा.
- खाण्याची योग्य वेळ- सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी मनुका नीट चावून-चावून खा.
- पाणीसुद्धा प्या- ज्या पाण्यात मनुके भिजवले होते, ते पाणी देखील प्यावे. या पाण्यातही मनुक्याचे गुणधर्म उतरलेले असतात.
NOTE: जर तुम्ही मधुमेहाचे (शुगरचे) रुग्ण असाल, तर याचे सेवन करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
डॉ. राम अवतार यांच्याबाबत माहिती
डॉ. राम अवतार हे दिल्ली सरकारचे योग विभागाचे निवृत्त प्रोजेक्ट ऑफिसर आहेत. त्यांच्याकडे योग आणि ध्यान (Yoga & Meditation) क्षेत्रातील 38 वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा दीर्घ आणि व्यावहारिक अनुभव आहे. त्यांनी योग, प्राणायाम, ध्यान, नाडी विज्ञान, औषधी वनस्पती/पारंपरिक वैद्यकशास्त्र, निसर्गोपचार (नॅचुरोपॅथी), रेकी, होमिओपॅथी आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून अनेक गुंतागुंतीच्या, असाध्य आजारांवर यशस्वी उपचार केले आहेत.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)