Soaked Anjeer Benefits: माझे नाव काजल आहे, मी दिल्लीची राहणारी आहे. मला बाहेरचे खाण्याची प्रचंड आवड होती. तुमचा विश्वास बसणार नाही, पण माझा एकही दिवस असा जात नव्हता ज्या दिवशी मी बाहेरचे खाद्यपदार्थ खाल्ले नाही. रोज संध्याकाळी 6 वाजता मित्रमैत्रिणींना फोन करणे आणि बाहेर खायला जाणे जणू माझा दैनंदिन दिनक्रम बनला होता, पण मला माहिती नव्हते की माझी ही सवय पुढे जाऊन मला इतका त्रास देईल. मोमोज, सामोसे, पिझ्झाची क्रेझ इतकी होती की मी हे विसरून गेले होते की माझ्या शरीराला पुढे जाऊन किती त्रास सहन करावा लागू शकतो. उदाहरणार्थ
- माझ्या पोटात दुखू लागले
- माझे वजन वाढू लागले
- त्वचेशी संबंधित समस्या होऊ लागल्या
- मला फॅटी लिव्हर डिटेक्ट झाले (निदान झाले)
एक दिवस मी ठरवले की जर मला निरोगी राहायचे असेल तर माझी सवय विसरून माझ्या डाएटमध्ये काहीतरी हेल्दी पदार्थांचा समावेश करावा लागेल. मग मी डॉक्टर राम अवतार यांना भेटले. डॉ. राम अवतार यांना योग, आयुर्वेद, नाडी विज्ञान आणि न्युरोथेरपीच्या क्षेत्रात 38 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. संभाषणादरम्यान त्यांनी मला अंजीर खाण्याच्या फायद्यांबाबत माहिती सांगितली. सकाळी रिकाम्या पोटी अंजीर भिजवून खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतात, असे त्यांचे म्हणणे होते.
रिकाम्या पोटी भिजवलेले अंजीर खाण्याचे फायदे
1. वेटलॉस
डॉ. राम अवतार यांच्या मते अंजीर हे फळ फायबरचे चांगले स्रोत आहे. बाहेरचे खाऊन माझे वजन वाढले होते, ते कमी करण्यासाठी मी अंजिराचा माझ्या दैनंदिन दिनक्रमात समावेश केला. हे पोट दीर्घकाळ भरलेले ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन कमी होते.
2. पोटासाठी उत्तम
अंजीरमध्ये आढळणारे फायबर पोटाशी संबंधित समस्या जसे की बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. नियमितपणे याचे सेवन केल्याने माझे पोट ठीक राहू लागले.
3. हृदय ठेवते निरोगी
अंजीरमध्ये पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. हे दोन्ही ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. अशा वेळी याचे सेवन हृदयासाठीही फायदेशीर आहे.
4. हाडांसाठी चांगले
आजच्या काळात बहुतांश लोक हाडांच्या समस्येने त्रस्त आहेत. अंजीरमधील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हाडे आणि दातांची मजबुती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
5. इम्युनिटी बूस्टर (प्रतिकारशक्ती वाढवणारे)
बदलत्या हवामानात मी वारंवार आजारी पडायचे, अंजीरचा आहारात समावेश केल्याने माझी प्रतिकारशक्ती मजबूत झाली आणि मी कमी आजारी पडू लागले.
(नक्की वाचा: Methi Water Benefits: सलग 21 दिवस सकाळी रिकाम्या पोटी प्या मेथीचे पाणी, शरीरात वेगाने घडतील हे थक्क करणारे बदल)
6. ऊर्जेचा चांगला स्रोत
मला नेहमी थकल्यासारखे वाटायचे. सुक्या अंजिरामध्ये असणारी नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट्सने मला पुन्हा एनर्जेटिक वाटण्यास मदत मिळाली.
(नक्की वाचा: Acidity Home Remedies: पोटातील जळजळ आणि ॲसिडिटीने त्रस्त आहात? न्युट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी सांगितले 5 सोपे उपाय)
7. त्वचेसाठी फायदेशीर
अंजीरमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला फ्री-रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार दिसू शकते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )