Health Benefits Of Soaking Mangoes: उन्हाळा आला की सर्वांना वेध लागतात ते म्हणजे रसाळ आणि गोड आंबे खाण्याचे. पण तुम्हाला माहिती आहे का, की थेट बाजारातून आणलेला आंबा खाणे तुमच्या शरीरातील उष्णता आणि जळजळ वाढवू शकते? या समस्या टाळण्यासाठी तुम्ही आपल्या आजीचा उपाय करू शकता, ते म्हणजे आंबा खाण्यापूर्वी पाण्यात भिजवून ठेवणे. बहुतांश वेळेस आपण आंबा विकत आणतो, केवळ पाण्याने धुतो आणि लगेचच खातो. पण आंबा खाण्यापूर्वी काही वेळ पाण्यात भिजत का ठेवावा, याबाबत डॉक्टर समीर भाटी यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊया...
आंबा भिजवून खाण्याचे फायदे | Health Benefits Of Soaking Mangoes
- शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते.
- पोटातील जळजळ आणि अॅसिडिटीची समस्या होण्यापासून बचाव होतो.
- आंब्यातील नैसर्गिक पोषक तत्त्वांचा शरीराला उत्तम प्रकारे पुरवठा होतो.
- पोटाच्या समस्या असणाऱ्यांनी आंबा पाण्यात भिजवून खाणे फायद्याचे ठरेल.
आंबा भिजवणे का आवश्यक आहे?
आंबा हे उष्ण प्रकृतीचे फळ आहे. त्यामुळे हे फळ पाण्यात भिजवल्याने त्यातील अतिरिक्त उष्णता कमी होते, ज्यामुळे शरीर गरम होणे, डोकेदुखी किंवा अस्वस्थता जाणवत नाही. भिजवलेला आंबा पचायलाही हलका असतो.
(नक्की वाचा: Khobryachya Wadya Recipe: तोंडात विरघळणारी हलवाई स्टाइल नारळ बर्फी आता बनवा फक्त 15 मिनिटांत, वाचा सोपी रेसिपी)
आंबा पाण्यात न भिजवता खाण्याचे तोटे
काही व्यक्तींना थेट आंबा खाल्ल्याने खालील त्रास होऊ शकतात
- पोटात जळजळ किंवा ॲसिडिटी होणे
- तोंडामध्ये फोड येणे
- अंगाची लाहीलाही होणे
- संवेदनशील त्वचा असलेल्यांना रॅशेस किंवा खाज सुटणे.
FAQs
1.आंबा भिजवल्याने काय फरक पडतो?
उत्तर- बाजारात मिळणाऱ्या आंब्यांवर अनेकदा कीटकनाशके आणि रसायने फवारलेली असतात. पाण्यात भिजवल्याने आंबा खाण्यास अधिक योग्य, पचायला हलका आणि आरोग्यासाठी सुरक्षित होतो. तसेच आंब्यातील फायटिक ॲसिडचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे पोट फुगणे किंवा गॅस होण्यासारख्या समस्या उद्भवत नाहीत.
Photo Credit: NDTV Marathi
2. आंबा कसा आणि किती वेळ पाण्यात भिजवावा?
उत्तर- आंबा 30 मिनिटे ते 1 तास स्वच्छ पाण्यात भिजत ठेवावा.
त्यानंतर आंबा नीट धुवून त्याचे साल काढून खावा.
लक्षात ठेवा: आंबा कापून नाही, तर अख्खा आंबाच भिजवणे जास्त फायदेशीर असते.
3. आंबा भिजवून खाणे कोणासाठी हे अधिक गरजेचे आहे?
उत्तर- लहान मुले, गर्भवती महिला, संवेदनशील पोट असलेले लोक आणि ज्यांना उष्णतेचा लवकर त्रास होतो, त्यांनी आंबा पाण्यात भिजवूनच खाल्ला पाहिजे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)