Benefits Of Squeezing Lemon On Food: खाद्यपदार्थांवर लिंबू पिळून खाण्याची सवय आहे? शरीरावर काय होतो परिणाम?

Benefits Of Squeezing Lemon On Food: भाजी किंवा डाळीवर लिंबू पिळून खाण्याचे काय फायदे आहेत? पचनक्रिया कशी सुधारते? वाचा सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Benefits Of Squeezing Lemon On Food: लिंबाचा रस पिळून खाण्याचे फायदे"
Canva

Benefits Of Squeezing Lemon On Food: आपण आतापर्यंत सॅलड, पोहे, आलू चाट यासारख्या पदार्थांवर लिंबू पिळताना तुम्ही हॉटेल किंवा एखाद्या खाण्याच्या स्टॉलवरही पाहिले असेल. काही लोक असेही आहेत, ज्यांना भाजीवरही लिंबू पिळून खायला आवडते. तुम्हीसुद्धा असे करता का? जर उत्तर हो असेल या लेखातील माहिती फक्त तुमच्यासाठी आहे. लिंबाच्या रसामुळे खाद्यपदार्थांची चव वाढतेच शिवाय शरीरालाही असंख्य फायदे मिळतात. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.. 

वरण असो किंवा कोणतीही भाजी, जर तुम्ही सर्व पदार्थांवर लिंबू पिळून खात असाल तर शरीराला कोणते फायदे मिळतील?  

येथे पाहा व्हिडीओ...

Advertisement

खाद्यपदार्थांवर लिंबू पिळून खाण्याचे फायदे | Is Squeezing Lemon On Food Good For You?

1. पोटासाठी फायदेशीर

खाद्यपदार्थावर लिंबाचा रस पिळून खाल्ल्याने त्यातील व्हिटॅमिन सी मुळे पाचक एन्झाइम्स सक्रिय होतात, ज्यामुळे जड अन्न सहज पचते. एवढेच नाही तर लिंबामध्ये आढळणारे फायबर पोटाशी संबंधित समस्या जसे की बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅस कमी करण्यासही मदत करते.  

(नक्की वाचा: Stomach Health: रिकाम्या पोटी 'या' 3 गोष्टी खाणं बंद करा, पोटाचं आरोग्य कायमचं बिघडेल! डॉक्टरांचा गंभीर इशारा)

2. लोह शोषून घेण्याची प्रक्रिया सुधारते 

जर तुम्ही पालक, डाळ किंवा चणे यासारख्या पदार्थांवर लिंबाचा रस पिळून खाल्ला तर ते शरीराची लोह शोषून घेण्याची प्रक्रिया दुप्पटीने सुधारेल, ज्यामुळे ॲनिमिया यासारख्या अनेक आजारांपासून आराम मिळू शकतो.

(नक्की वाचा: सावधान! दिवसभरात 4 ते 5 कप चहा पिताय? शरीरात 'या' 2 व्हिटॅमिन्सची होतेय कमतरता, डॉक्टरांची धक्कादायक माहिती)

Advertisement

काय करू नये?

तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की, अन्न शिजवताना लिंबाचा रस मिक्स करू नये तर अन्न शिजल्यानंतर वरून पिळायचे आहे. नाहीतर तुमच्या शरीराला व्हिटॅमिन सी मिळणार नाही.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)