Castor Oil Benefits: एरंडेल तेलाचे 10 जबरदस्त फायदे, केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळ्यासाठी होईल फायदा

आजकाल गुटगुटीत दिसण्यासाठी महागड्या सुपरफूड्सचा वापर करण्याची फॅशन असली, तरी आपल्या घरातच एक खूप प्रभावी आणि औषधी गुणधर्म असलेले 'एरंडेल' तेल उपलब्ध आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Castor Oil Benefits: आजकाल गुटगुटीत दिसण्यासाठी महागड्या सुपरफूड्सचा वापर करण्याची फॅशन असली, तरी आपल्या घरातच एक खूप प्रभावी आणि औषधी गुणधर्म असलेले 'एरंडेल' तेल उपलब्ध आहे, असे मत 'जस्ट फॉर हार्ट्स'चे डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, एरंडेल तेल केवळ एक सामान्य तेल नसून, ते एक औषध म्हणून काम करते. डॉ. कुलकर्णी यांनी एरंडेल तेलाचे 10 फायदे सांगितले आहेत.

हे फायदे ऐकल्यानंतर आरोग्यासाठीची महागडी औषधेही फिकी पडतात. एरंडेलाचे तेल प्यायल्याने होणाऱ्या फायद्यांमध्ये आतड्यांची (gut) स्वच्छता, यकृताचे (liver) काम सुधारणे, आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढणे हे प्रमुख आहे. तसेच, हे तेल रोगप्रतिकारशक्ती (immunity) वाढवते, हार्मोन्सची (hormones) स्वच्छता करते आणि सांधेदुखी (joint pain) कमी करणे हे फायदे दिसून येतात.सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आतून शरीर स्वच्छ झाल्यामुळे त्वचेलाही फायदा होतो असे डॉ.कुलकर्णी यांनी म्हटले आहे. 

नक्की वाचा - Chia seeds in Marathi: चिया सीड्स खाण्याचे फायदे, सेवन करण्याची योग्य पद्धत आणि दुष्परिणाम

एरंडेल तेलाचे 10 जबरदस्त फायदे  

  • पोटासाठी: बद्धकोष्ठतेसाठी (constipation) खूप फायदेशीर आहे.
  • शरीर शुद्धी: शरीरातील घाण साफ करून 'डिटॉक्स' (detox) होण्यास मदत करते.
  • यकृताचे कार्य: यकृताचे (liver) काम सोपे करते.
  • जंतांवर उपाय: पोटातील जंत (worms) बाहेर काढते.
  • त्वचेची चमक: आतून शरीर स्वच्छ झाल्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक (skin glow) येते.
  • रोगप्रतिकारशक्ती: रोगप्रतिकारशक्ती (immunity) वाढवते.
  • केसांची काळजी: केसांना लावल्यास केस मजबूत (hair strengthening) होतात.
  • हार्मोन्स: हार्मोनल स्वच्छतेसाठी (hormonal cleansing) उपयुक्त आहे, त्यामुळे PCOS मध्येही फायदा होतो.
  • सांधेदुखी: सांधेदुखी (joint pain) कमी करते.
  • पोटाची सूज: पोटाची हट्टी सूज (stubborn bloating) कमी करते.

डॉक्टरांनी हे तेल घेण्याच्या पद्धतीबद्दल मार्गदर्शन करताना सांगितले की, 1-2 चमचे एरंडेल तेल गरम पाण्यासोबत सकाळी रिकाम्या पोटी घ्यावे. हे आठवड्यातून एकदा किंवा गरजेनुसार वापरले जाऊ शकते. मात्र, हे वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मधुमेह (Diabetes), तीव्र ऍसिडिटी किंवा IBS चा त्रास असलेल्या रुग्णांनी स्वतःहून हे तेल घेऊ नये, असेही त्यांनी सांगितले आहे.

Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)