जाहिरात

High Cholesterol Remedy: कोलेस्टेरॉल पटकन होईल गायब, हृदय लोखंडासारखे मजबूत होईल; या 7 चमत्कारिक पदार्थांचे करा सेवन

Health News: नामवंत डॉक्टर सूद यांनी कोलेस्टेरॉलच्या समस्येबद्दल बोलताना म्हटले की, कोलेस्टेरॉल नियंत्रणात आणण्यासाठी  तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत मोठे बदल करण्याची गरज नाही. 7 गुणकारी पदार्थांचे सेवन करूनही तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.  

High Cholesterol Remedy: कोलेस्टेरॉल पटकन होईल गायब, हृदय लोखंडासारखे मजबूत होईल; या 7 चमत्कारिक पदार्थांचे करा सेवन
मुंबई:

Foods To Lower Bad Cholesterol: उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकार आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं.  मात्र, योग्य आहार घेतल्यास हाय कोलेस्टेरॉलची समस्या प्रभावीपणे नियंत्रणात आणता येणे शक्य आहे.  काही पौष्टिक आणि नैसर्गिक पदार्थ  आहे जे शरीरातील 'चांगलं' कोलेस्टेरॉल (HDL) वाढण्यास मदत करतात आणि 'खराब' कोलेस्टेरॉल (LDL) कमी करण्यास मदत करतात. हे पदार्थ नेमके कोणते, याबाबत अनेकांना माहिती नाहीये. नामवंत डॉक्टर सूद यांनी कोलेस्टेरॉलच्या समस्येबद्दल बोलताना म्हटले की, कोलेस्टेरॉल झपाट्याने नियंत्रणात आणण्यासाठी  तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत मोठे बदल करण्याची गरज नाही. 7 गुणकारी पदार्थांचे सेवन करूनही तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.  

नक्की वाचा : आसनांचा सराव करताना पोट रिकामं का असावे? टिप्स फॉलो करा अन्यथा होतील हे दुष्परिणाम

एक्सप्रेस यूकेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये, डॉ. सूद यांनी यांनी सांगितलेल्या उपायांबद्दल माहिती देण्यात आली आहे. ही बातमी एका व्हिडीओच्या आधारे करण्यात आली असून यात डॉ.सूद यांनी कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करणाऱ्या 7 पदार्थांची माहिती दिली आहे. हे पदार्थ तुम्ही नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण किंवा अगदी स्नॅक्समध्येही समाविष्ट करू शकता.

ओटमील

Latest and Breaking News on NDTV

ओटमीलमध्ये फायबर, विशेषतः 'बीटा-ग्लूकन' हा प्रकार मोठ्या प्रमाणात असतो. हे फायबर तुमच्या पोटात खराब कोलेस्टेरॉल (LDL) शोषून घेण्यास आणि रक्तप्रवाहात पोहोचण्यापूर्वी ते शरीराबाहेर फेकण्यास मदत करतात. नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. बेरीज घालून गोड ओटमील बनवू शकता किंवा उकडलेल्या अंड्यासोबत अथवा अवाकाडोसोबत तुम्ही ओटमील खाऊ शकता. हा अत्यंत टेस्टी पर्याय आहे. तुम्ही ओट्सचा वापर स्मूदी, पॅनकेक किंवा घरगुती ग्रॅनोला बारमध्येही करू शकता.

अवाकाडो

Latest and Breaking News on NDTV

अवाकाडोमध्ये आरोग्यदायी मोनोअनसॅचुरेटेड फॅट्स असतात, जे 'चांगले' कोलेस्टेरॉल (HDL) वाढवण्यासाठी मदत करतात आणि 'वाईट' कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. अवाकाडोमधील फॅट आणि फायबर हे चांगले कोलेस्टेरॉल वाढवण्यास आणि वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी दुहेरी शस्त्राप्रमाणे काम करतात.  

बदाम

Latest and Breaking News on NDTV

दिवसातून एक मूठभर बदाम खाल्ल्याने LDL कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते, बदाम हे निरोगी हृदयासाठीही फाय फायदेशीर आहेत.  बदामात चांगले फॅट्स, फायबर आणि प्लांट स्टेरोल्स असतात जे हृदय बळकट करण्यास मदत करतात. हेच घटक नैसर्गिकरित्या कोलेस्टेरॉल घटवण्यासही मदत करतात. बदाम टेस्टी असल्याने ते खाताना अतिरेक करू नये तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्याची रोजच्या सेवनाची योग्य मात्रा ठरवून घ्यावी. 

सोया

Latest and Breaking News on NDTV

अनेकांना प्रश्न पडू शकतो की वाईट कोलेस्टेरोलच्या नियंत्रणासाठी सोया कसा काय मदत करेल. मात्र सोया हा यासाठी अत्यंत प्रभावी आहे. सोयामध्ये 'आयसोफ्लाव्होन' नावाचे संयुग असतं, जे इस्ट्रोजेनसारखं असतं आणि ते कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतं. प्रोटीन अथवा प्रथिनांची शरीराला असलेली गरज भागवण्यासाठी मांसाच्या ऐवजी सोयाचा वापर केला तर LDL पातळी कमी होण्यास मदत होते. 

बेरीज्

Latest and Breaking News on NDTV

बेरीज केवळ दिसायल सुंदर दिसतात, चवीला अप्रतिम लागतात आणि त्या आबालवृद्धांना आवडतात.  त्या अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरने परिपूर्ण असतात, आणि बेरीजचे सेवन हृदय निरोगी ठेवण्यास खूप फायदेशीर असते.  बेरीजमधील पॉलीफेनॉल घटक सूज कमी करण्यास आणि रक्तवाहिन्यांचे काम प्रभावी व्हावे यासाठी मदत करतात.  बेरीजमध्ये असलेले फायबर कोलेस्टेरॉल शोषून घेण्याचे प्रमाण कमी करते. ओटमीलसोबत तुम्ही बेरीज खाऊ शकता, जो अत्यंत चविष्ट आणि हेल्थी पर्याय आहे.  स्मूदीमध्ये घालून, दह्यात मिसळून बेरीज खाऊ शकता. हे आवडत नसेल तर नुसत्या बेरीजही खाऊ शकता.  

सॉल्मन

Latest and Breaking News on NDTV

सॉल्मन माशामध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणात असते, जे तुमच्या हृदयासाठी अत्यंत गुणकारी असते.  ओमेगा-3 ट्रायग्लिसराइड्स कमी करते, HDL कोलेस्टेरॉल वाढवण्यास मदत करते. 

ऑलिव्ह ऑइल 

Latest and Breaking News on NDTV

ऑलिव्ह ऑइल फक्त सॅलड ड्रेसिंगसाठी असतं असं अनेकांना वाटतं मात्र असं नाहीये. ऑलिव्ह ऑइल हे अत्यंत गुणकारी आहे. एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलमध्ये मोनोअनसॅचुरेटेड फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात LDL कोलेस्टेरॉल वेगाने घटवण्यास मदत करतात.  बार्बेक्यू केलेल्या किंवा भाजलेल्या भाज्यांवर ऑलिव्ह ऑइल घालून खाऊ शकता किंवा थोडंसं ब्रेडला लावून सँडविच करूनही खाऊ शकता. ऑलिव्ह ऑइल गुणकारी नक्की आहे, मात्र त्याचे सेवन नियंत्रितपणे करणे गरजेचे असते. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Listen to the latest songs, only on JioSaavn.com