
Kidney Stone Treatment: मूत्रपिंड किंवा मूत्रमार्गामध्ये खनिज-क्षारांचे छोटे-छोटे खडे तयार होतात. लघवीमध्ये काही गोष्टींचे प्रमाण वाढते आणि पाण्याची कमतरता निर्माण होते, तेव्हा मूतखडे तयार होतात. तुम्ही देखील मूतखड्यांच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? नैसर्गिक औषधोपचार पद्धती शोधत आहात का? तर या लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. मूतखड्यावर पपईच्या बिया रामबण उपाय ठरू शकतात. पपईच्या बियांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास मूतखड्यांच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. केवळ पपईच नव्हे तर या फळाच्या बिया आणि पाने देखील आरोग्यासाठी लाभदायक आहेत. पपईच्या बियांमध्ये औषधीय गुणधर्मांचा साठा आहे; यामध्ये लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्मांचा समावेश आहे. पपईच्या बियांमुळे मूतखड्याची समस्या कशी कमी होऊ शकते, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
पपईच्या बिया खाल्ल्यास काय होईल? (Papaya Seeds Benefits)
पपईच्या बियांमधील औषधी गुणधर्म किडनीचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. किडनीतील खडे सहजरित्या बाहेर फेकले जाण्यासही मदत मिळते. तुम्ही देखील किडनी स्टोनमुळे त्रस्त असाल तर पपईच्या बिया सुकवून त्याचे सेवन करावे.

Photo Credit: Canva
पपईच्या बियांचे सेवन कसे करावे? (How To Consume Papaya Seeds)
पपईच्या बियांचा विविध स्वरुपात डाएटमध्ये समावेश करू शकता. बिया तुम्ही थेट चावूनही खाऊ शकता, बिया सुकवून त्याची पावडर तयार करुन स्मूदी किंवा ज्युसमध्ये मिक्स करु शकता. सॅलेड किंवा दह्यामध्येही पपईच्या बिया मिक्स करू शकता.
(नक्की वाचा: Kidney Stone: मूतखडा झाल्यास कोणते उपाय करावे?)
पपईच्या बियांची स्मूदी कशी तयार करावी? (How To Make Papaya Seeds Smoothie)
सामग्री :
- पपईच्या बिया
- दही
- दूध
- मध
- वेलची पावडर
- बर्फ (आवश्यकता असल्यास)
पाककृती
- स्मूदी तयार करण्यासाठी सर्वप्रथम पपईच्या बिया व्यवस्थित धुऊन स्वच्छ करा आणि सुकवा.
- पपईच्या बिया, दही, दूध, मध आणि वेलची पावडर एकत्रित मिक्सरमध्ये वाटा.
- मिश्रण व्यवस्थित ब्लेंड करा.
- पपईच्या ताज्या बियांची स्मूदी तयार झाल्यानंतर त्याचा आस्वाद घ्यावा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world