BCA Juice Benefits: गाजर, बीट, आवळा रस प्यायल्यास काय होतं? डिटॉक्स ज्युसमुळे चेहऱ्यामध्ये घडतील इतके मोठे बदल

BCA Detox Drink: बीट, गाजर आणि आवळ्याच्या ज्युसमध्ये व्हिटॅमिन, खनिजे, फायबरचे प्रमाण अधिक असते.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Health News: गाजर, बीट आणि आवळ्याचा ज्युस पिण्याचे फायदे"
Canva
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • सर्दियों में गाजर, चुकंदर और आंवला का जूस पीने से इम्यूनिटी मजबूत होती है और कई बीमारियों से बचाव होता है
  • चुकंदर में नाइट्रेट, प्राकृतिक शुगर, विटामिन्स, मिनरल्स और एंटीऑक्सीडेंट्स की अच्छी मात्रा पाई जाती है
  • गाजर फाइबर, विटामिन और खनिजों से भरपूर होती है जो आंखों, त्वचा और प्रतिरक्षा प्रणाली के लिए लाभकारी है
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Beetroot Carrot Amla Juice Benefits: हिवाळ्यात आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. कारण या ऋतूमध्ये आरोग्याशी संबंधित समस्यांचा धोका अधिक वाढतो. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते, ज्यामुळे कित्येक आजारांची लागण होण्याची भीती असते. हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी बीट, गाजर, आवळ्याचा ज्युस पिणे फायदेशीर ठरेल. या ज्युसमुळे शरीर डिटॉक्स होईल, रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल आणि त्वचेवर नैसर्गिक तेज देखील येईल. तसेच पचनप्रक्रिया देखील सुधारेल.

बीट, गाजर आणि आवळ्याचा ज्युस प्यायल्यास काय होईल? | Beetroot Carrot Amla Juice Benefits

  • एमडीपीआयतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार, बीटमध्ये (Beet Benefits) नायट्रेटचे प्रमाण जास्त असते, तसेच नैसर्गिक साखर, व्हिटॅमिन, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्सचाही समावेश असतो.

  • नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासातील माहितीनुसार, गाजरमध्ये व्हिटॅमिन, खनिज आणि फायबरचे प्रमाण अधिक असते; जे डोळे, त्वचा आणि रोगप्रतिकारकशक्तीकरिता आवश्यक आहेत.
  • आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि बी-कॉम्प्लेक्स या गुणधर्मांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम आणि फायबर यासारख्या खनिजांचाही उत्तम साठा आहे, आवळ्यामध्ये अँटी-ऑक्सिड्ंट्स आणि पॉलिफेनोलचेही प्रमाण जास्त आहे, जे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

(नक्की वाचा: Acidity Bloating Relief Tips: पोटातील हवा कशी बाहेर काढावी? करा हे 3 उपाय, पोट फुगणं होईल बंद)

रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल

बीट, गाजर आणि आवळ्याचा ज्युस प्यायल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल. गाजर - बीटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण आहे, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.

रक्ताभिसरण प्रक्रिया

गाजर, बीट आवळ्याचा ज्युस प्यायल्यास शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत मिळते. कारण बीटमध्ये लोह आणि फॉलेटचे प्रमाण असते, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते परिणाम शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो.

Advertisement

(नक्की वाचा: Chana Benefits: भिजवलेले चणे खाल्ल्यास वजन वाढते की घटते? 1 दिवसात किती प्रमाणात करावे सेवन? वाचा माहिती)

त्वचा आणि डोळ्यांसाठी फायदेशीर

त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी गाजर, बीट, आवळ्याचा ज्युस पिणे लाभदायक ठरेल. गाजरमधील बीटा-कॅरोटिन व्हिटॅमिन एमुळे दृष्टी सुधारण्यास आणि त्वचेवर तेज येण्यास मदत मिळते.

Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)