Turati Benefits: बाजारामध्ये 10 रुपयांत मिळणाऱ्या तुरटीचे असंख्य आरोग्यवर्धक फायदे आहेत. तुरटीचे रासायनिक नाव पोटॅशिअम अॅल्युमिनिअम सल्फेट असे आहे. तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल, अँटी-फंगल, अँटी-सेप्टिक आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे कित्येक समस्यांपासून सुटका मिळते. सोशल मीडिया क्रीएटर पूर्णिमाने व्हिडीओद्वारे तुरटीचा वापर करण्याच्या पाच पद्धती सांगितल्या आहेत.
तुरटीचा वापर कसा करावा? | How To Use Fitkari | How To Use Alum | How To Use Turati
1. तोंडाला येणारा दुर्गंध कमी होईल
तोंडाला दुर्गंध येत असेल तर तुरटीचा वापर करणं अतिशय फायदेशीर ठरू शकते. पाण्यामध्ये तुरटीची पावडर मिक्स करुन त्या पाण्याने गुळण्या करा. तुरटीच्या पाण्यामुळे तोंडातील जंतूंचा खात्मा होईल आणि तोंडाला येणारा दुर्गंधही कमी होईल. तुरटीच्या पाण्याचा तुम्ही नॅचरल माउथवॉशही म्हणूनही वापर करू शकता.
2. शरीराला येणारा वास कमी होईल
तुम्ही वापरणाऱ्या परर्फ्युमचा सुगंध दीर्घकाळ टिकून राहावा अशी इच्छा असेल तर यासाठी तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. शरीराच्या ज्या भागावर तुम्ही परर्फ्युमचा वापर करता तेथे तुरटीचा तुकडा हलक्या हाताने रगडावा. यामुळे शरीराला घामाचा वास येणार नाही.
3. नॅचुरल डिओरंट (Natural Deodorant)
तुरटीचा वापर तुम्ही नॅचुरल डिओरंट म्हणूनही करू शकता. याद्वारे घाम आणि शरीराला दुर्गंधाची समस्या दूर येण्यास मदत मिळते. केमिकलयुक्त डिओरंटचा वापर करायचा नसेल तर तुम्ही तुरटीचा वापर करू शकता.
4. भेगा पडलेल्या टाचा
हिवाळ्यामध्ये टाचांना भेगा पडण्याच्या समस्यांचा काही लोकांना सामना करावा लागतो. या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर तुरटीची पावडर नारळाच्या तेलामध्ये मिक्स करा. या मिश्रणामुळे टाचांची त्वचा मऊ होईल.
त्वचा डिटॉक्स करण्यासाठी तुरटी पावडर आंघोळीच्या पाण्यात मिक्स करू शकता. हा उपाय केल्यास शरीरावर जमलेली घाण स्वच्छ होण्यास मदत मिळेल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)