Health News: उन्हाळ्यात दूध पिणे फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या काय सांगते आयुर्वेद

ज्यांना वारंवार सर्दी-खोकल्याचा त्रास होतो, त्यांनी जायफळ टाकून दूध घ्यावे.

जाहिरात
Read Time: 2 mins

हिवाळ्यात दुधाचे सेवन आवर्जून केले जाते. मात्र उन्हाळा सुरू झाला की अनेकजण ताक किंवा लस्सीला पसंती देतात. पण आयुर्वेदानुसार, उन्हाळ्यातही दुधाचे महत्त्व कमी होत नाही. रात्रीच्या वेळी कोमट दूध पिणे शरीरासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. दूध हे केवळ अन्न नसून ते एक उत्तम औषधही आहे. भारतीय परंपरेत दुधाला 'पूर्णान्न' मानले जाते. उन्हाळ्याच्या दिवसात शरीर थंड ठेवण्यासाठी आणि ऊर्जा टिकवण्यासाठी दूध पिणे फायदेशीर ठरते. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने दूध घेतल्यास त्याचे शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येतात.

दुधाची पौष्टिकता वाढवण्यासाठी काय करावे? हे आपण जाणून घेणार आहोत. दुधात काही विशिष्ट घटक मिसळल्यास त्याची शक्ती द्विगुणित होते. त्या पैकी एक आहे हळद. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उन्हाळ्यात अगदी चिमूटभर हळद टाकून दूध प्यावे. ते आरोग्यास चांगले असते. या शिवाय महिलांच्या आरोग्यासाठी आणि त्वचेच्या तजेला टिकवण्यासाठी केशरयुक्त दूध उत्तम ठरते. शारीरिक कमकुवतपणा आणि हाडांच्या दुखण्यावर अश्वगंधा आणि दूध हे उत्तम मिश्रण आहे. मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि शांत झोप लागण्यासाठी दालचिनीचे दूध गुणकारी आहे.

Advertisement

नक्की वाचा - World Health Day 2026: 'या' 5 सवयी तुमचे आयुष्य 10 वर्षाने वाढवू शकतात, तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

ज्यांना वारंवार सर्दी-खोकल्याचा त्रास होतो, त्यांनी जायफळ टाकून दूध घ्यावे. यामुळे संसर्गापासून बचाव होतो. तर शुगर लेव्हल मेंटेन ठेवण्यासाठी दालचिनीचे दूध रामबाण उपाय मानले जाते. सौंदर्य आणि प्रजनन आरोग्य सुधारण्यासाठी केशर मिश्रित दुधाचा वापर करावा. या उन्हाळ्यात केवळ थंड पेयांवर अवलंबून न राहता, रात्रीच्या वेळी कोमट दुधाचा समावेश आपल्या आहारात नक्की करा. उन्हाळ्याच्या रात्री कोमट दूध पिणे आरोग्यासाठी वरदान ठरू शकते. आयुर्वेदानुसार, दूध केवळ पोषण देत नाही, तर ते मनाला शांत करण्याचे कामही करते. शरीरातील त्रिदोष संतुलित ठेवण्यासाठी दुधाचा वापर प्रभावी ठरतो.

नक्की वाचा - Water Melon: मधुमेहाच्या रुग्णांनी कलिंगड खावा की खाऊ नये? दिवसभरात किती प्रमाणात आणि कसे खावे कलिंगड? वाचा

रोजच्या दुधात थोडी हळद टाकल्याने शरीराची आतून स्वच्छता होते. त्यातून रोगप्रतिकारशक्ती वाढते.  पुरुषांमधील शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी आणि हाडांना मजबूती देण्यासाठी हे दुध आणि अश्वागंधा मिश्रण गुणकारी आहे. कामाचा ताण आणि झोप न येणे या समस्यांवर दालचिनीचे दूध एक उत्तम नैसर्गिक उपचार आहे. बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या त्रासांपासून वाचण्यासाठी जायफळ टाकून दूध पिणे हिताचे आहे. त्यामुळे हिवाळ्या प्रमाणे उन्हाळ्यात ही तुम्ही दुध पिऊ शकता. त्याचे निश्चितच फायदे तुम्हाला मिळतील.