- डॉ. सुनील राणा यांच्या मते दररोज ३० मिनिटांचा व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयाचे आजार कमी होतात
- प्रक्रिया केलेल्या अन्नाऐवजी पालेभाज्या, फळे आणि प्रथिने यांचा समावेश असलेला संतुलित आहार शक्ती वाढवतो
- सात ते आठ तासांची शांत झोप हार्मोनल असंतुलन टाळते आणि शरीराच्या पुनर्रचनेसाठी आवश्यक आहे
बदलती जीवनशैली आणि वाढता ताणतणाव यामुळे आजारांचे प्रमाण वाढत असतात. केवळ 5 सोप्या सवयींच्या जोरावर आपण आपले आयुष्य 10 वर्षांनी वाढवू शकतो, असा दावा वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने इंटरनल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. सुनील राणा यांनी दीर्घायुष्यासाठी आवश्यक असलेल्या पंचसूत्रीवर प्रकाश टाकला आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, हे आपण सर्वच जाणतो. पण हे आरोग्य टिकवायचे कसे? जागतिक आरोग्य दिन 2026 च्या निमित्ताने डॉक्टरांनी अशा 5 छोट्या पण महत्त्वाच्या सवयी सांगितल्या आहेत, ज्या तुमचे आयुष्य 8 ते 10 वर्षांनी वाढवू शकतात.
डॉ. राणा यांच्या मते, दररोज केवळ ३० मिनिटांचा व्यायाम रक्ताभिसरण सुधारतो आणि हृदयाचे आजार दूर ठेवतो. यासोबतच प्रक्रिया केलेल्या अन्नाऐवजी (Processed Food) पालेभाज्या, फळे आणि प्रथिनांचा समावेश असलेला संतुलित आहार शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. हे सर्वांसाठीच फायद्याचे ठरून शकते. त्यामुळे पालेभाज्या फळे हे आहारात असणे गरजेचे आहे.
आजच्या धावपळीच्या युगात 7-8 तासांची शांत झोप घेणे अनिवार्य आहे. झोपेच्या कमतरतेमुळे हार्मोनल असंतुलन निर्माण होते. तसेच, तणावावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग आणि ध्यानाचा अवलंब करणे हा 'सायलेंट किलर'ला रोखण्याचा प्रभावी मार्ग आहे. दरवर्षी नियमित आरोग्य तपासणी केल्यास भविष्यातील मोठे धोके टाळता येतात, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे शांत झोप खूप आवश्यक आहे.
आरोग्याची पंचसूत्री:
- 1. व्यायाम: दिवसातून किमान 30 मिनिटे वेगाने चालणे किंवा व्यायाम करणे.
- 2. आहार: जंक फूड टाळून सकस आणि पौष्टिक जेवण घेणे.
- 3. झोप: शरीराच्या रिकव्हरीसाठी 7 ते 8 तासांची गाढ झोप आवश्यक.
- 4. तणावमुक्ती: छंदांना वेळ देणे आणि योगासने करून मानसिक शांतता मिळवणे.
- 5. चेकअप: आजार बळावण्याआधीच दरवर्षी न चुकता हेल्थ चेकअप करणे.
डॉक्टरांच्या मते, दीर्घायुष्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. मात्र, या छोट्या बदलांमुळे शरीरातील वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते आणि आपण अधिक उत्साही राहतो. चला तर मग, या जागतिक आरोग्य दिनी एक पाऊल निरोगी आयुष्याकडे टाकूया. डॉक्टरांच्या मते, नियमित 30 मिनिटांची शारीरिक हालचाल हृदयविकाराचा धोका कमी करते. आहारातील बदल, विशेषतः प्रथिनांचा आणि हिरव्या भाज्यांचा समावेश, शरीराला अंतर्गत ताकद देतो. अपुरी झोप आणि वाढता मानसिक ताण हे आरोग्याचे मोठे शत्रू असून, त्यावर मात करण्यासाठी 7-8 तासांची झोप आणि ध्यानधारणा गरजेची आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world