- आयुर्वेदात लसूण आणि मध यांचे मिश्रण अनेक आजारांवर प्रभावी उपचार म्हणून वापरले जाते
- लसणामध्ये असलेले एलिसिन नैसर्गिक प्रतिजैविक आणि अँटीऑक्सिडंट म्हणून रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते
- मधामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलिफेनोल्स असतात जे शरीरातील जळजळ कमी करते
Garlic Honey Benefits:आयुर्वेदामध्ये निसर्गाकडून मिळालेल्या औषधी वनस्पतींनी शतकानुशतके आजारांवर उपचार केले जात आहेत. आपल्या स्वयंपाकघरातच अशा काही गोष्टी आहेत, ज्यांच्या केवळ सेवनाने शरीराला आरोग्याचे वरदान मिळू शकते. लसूण आणि मध या अशाच दोन गोष्टी आहेत ज्या प्रत्येक घरात सहज उपलब्ध होतात. परंतु या दोघांचे मिश्रण शरीरासाठी एखाद्या'संजीवनी' पेक्षा कमी नाही.
लसणाचा वापर केवळ भाज्यांची चव वाढवण्यासाठीच नाही, तर अनेक रोगांवर उपचार म्हणूनही केला जातो. आयुर्वेदानुसार, वाढलेल्या कोलेस्ट्रॉलने त्रस्त असलेल्या लोकांना लसणाच्या कच्च्या पाकळ्या खाण्याचा सल्ला दिला जातो. लसणामध्ये 'एलिसिन' (Allicin) नावाचे आरोग्यदायी घटक असते. जे एक प्रकारचे नैसर्गिक प्रतिजैविक (Antibiotic) आणि अँटीऑक्सिडंट आहे. याच्या सेवनाने शरीरातील रक्तभिसरण सुधारते आणि रक्त जाड होत नाही. लसणातील सल्फर आणि इतर रसायने त्याला बॅक्टेरियाविरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म प्रदान करतात.
मध हा निसर्गाचा असा गोड अनमोल ठेवा आहे, ज्याचा मधुमेह असलेल्या व्यक्तींवरही फारसा परिणाम होत नाही (मर्यादित सेवनाने). मधामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलिफेनोल्स नावाचे दोन महत्त्वाचे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील खाज, लालसरपणा कमी करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. मधातील अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म विविध आजारांशी लढण्यास मदत करतात.
इथियोपियाच्या पारंपारिक औषधोपचारात लसूण आणि मधाच्या मिश्रणाला शरीरासाठी अमृत मानले गेले आहे. हे मिश्रण श्वसनाचे आजार, संसर्ग, त्वचेचे रोग, हृदयविकार आणि पोटाच्या समस्यांवर अत्यंत प्रभावी आहे. हे मिश्रण सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे कमी करते आणि रक्त पातळ करून 'स्ट्रोक'चा धोका कमी करते. याशिवाय उच्च रक्तदाब, संधिवात, दातदुखी आणि बद्धकोष्ठतेमध्येही हे अत्यंत गुणकारी आहे.
कसे तयार करावे हे मिश्रण?
- एका स्वच्छ काचेच्या बरणीत ताज्या लसणाच्या पाकळ्या सोलून टाका.
- त्यात शुद्ध मध घालून बरणी पूर्ण भरा.
- 5 ते 7 दिवस हे मिश्रण तसेच राहू द्या (फरमेंट होऊ द्या).
- त्यानंतर दररोज सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा.
- टीप: लहान मुले आणि गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच याचे सेवन करावे.