जाहिरात
This Article is From Mar 09, 2026

Gudi Padwa 2026: 18 की 19 मार्च? गुढी पाडवा नक्की कोणत्या तारखेला? जाणून घ्या पूजा विधी अन् शुभ वेळ

गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान केले जाते. त्यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर तोरण लावून सडा-रांगोळी काढली जाते.

Gudi Padwa 2026: 18 की 19 मार्च? गुढी पाडवा नक्की कोणत्या तारखेला? जाणून घ्या पूजा विधी अन् शुभ वेळ

हिंदू संस्कृतीतील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक आणि नवीन वर्षाची सुरुवात करून देणारा सण म्हणजे गुढीपाडवा. 2026 मध्ये गुढीपाडव्याच्या तारखेबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. चैत्र महिना उजाडला की नवीन संकल्प, नवीन खरेदी आणि आनंदाचे वातावरण असते. यावर्षी गुढीपाडवा नेमका कधी साजरा करायचा आणि गुढी उभारण्याची योग्य वेळ कोणती, याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. यावेळी गुढी पाडवा नक्की कोणत्या तारखेला याबाबतही उत्सुकता आहे. 

पंचांगानुसार, चैत्र शुद्ध प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी आहे. प्रतिपदा तिथीचा प्रारंभ 19 मार्च रोजी सकाळी 6:55 वाजता होणार असून, तिथीची समाप्ती 20 मार्च रोजी पहाटे 4:50 वाजता होईल. उदयतिथीनुसार, गुरुवार, 19 मार्च 2026 रोजीच संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडवा उत्साहात साजरा केला जाईल. 19 मार्च रोजी सूर्योदय सकाळी 6:26 वाजता होईल. गुढी उभारण्यासाठी सकाळी सूर्योदयानंतरची वेळ अत्यंत शुभ मानली जाते. तसेच, दुपारी 12:04 ते 12:53 या वेळेत 'अभिजित मुहूर्त' असल्याने या काळातही धार्मिक विधी उरकले जाऊ शकतात.

नक्की वाचा - Akshaya Tritiya 2026 Date: 19 की 20 एप्रिल? कधी आहे अक्षय तृतीया? कधी आहे सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त? वाचा

गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान केले जाते. त्यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर तोरण लावून सडा-रांगोळी काढली जाते. एका बांबूच्या काठीला नवीन वस्त्र (साडी किंवा खण) नेसवून त्यावर कडुनिंबाची डहाळी, साखरेची गाठी आणि फुलांचा हार बांधला जातो. या काठीवर तांब्याचा कलश उपडा ठेवून ती गुढी घराबाहेर किंवा बाल्कनीत उंच ठिकाणी उभारली जाते. गुढीला हळद-कुंकू लावून, धूप-दीप दाखवून तिची पूजा केली जाते आणि गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो.

नक्की वाचा - Last Road of India: जमिनीचा अंत अन् अथांग समुद्र; निसर्गाचा अद्भूत चमत्कार, मात्र इथे कुणी राहू शकत नाही!

यंदा गुढीपाडवा नेमका कधी, असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? तर त्याचे उत्तर आहे 19 मार्च! गुरुवारी सकाळी सूर्योदयानंतर चैत्र प्रतिपदा सुरू होत असल्याने अवघा महाराष्ट्र याच दिवशी गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत करेल. सकाळी 6 वाजून 55 मिनिटांपासून प्रतिपदा तिथी लागत असल्याने घराघरात आनंदाची गुढी उभारली जाईल. दुपारी 12 च्या सुमारास असणारा अभिजित मुहूर्त कोणत्याही शुभ कार्यासाठी अतिशय उत्तम आहे. त्यामुळे नवीन गाडी, घर किंवा कोणतीही मोठी खरेदी करायची असेल, तर 19 मार्च हा दिवस तुमच्यासाठी 'लकी' ठरणार आहे.

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com