Vajrasana Benefits: वज्रासनात बसल्यास कोणकोणते फायदे मिळतील? रिकाम्या पोटी वज्रासनाचा सराव केल्यास काय होईल?

Vajrasana Benefits: वज्रासन हे योगासनांमधील सर्वात सोपे आणि प्रभावी आसन आहे. याचा सराव केल्यास आरोग्यास कोणकोणते फायदे मिळतील, जाणून घेऊया सविस्तर माहिती... 

जाहिरात
Read Time: 2 mins
"Vajrasana Benefits: रिकाम्या पोटी वज्रासन करण्याचे फायदे"
Canva

Vajrasana Benefits: योगासनांचा नियमित सराव केल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यास असंख्य लाभ मिळतात. या लेखाद्वारे आपण वज्रासनाची माहिती जाणून घेणार आहोत. हे आसन सरावासाठी अतिशय सोपे आणि आरोग्यासाठी प्रभावी मानले जाते. याद्वारे शरीराची पचनप्रक्रिया सुधारण्यासह मानसिक आरोग्यासही लाभ मिळतात. रिकाम्या पोटी वज्रासनाचा सराव केल्यास कोणकोणते फायदे मिळतीत, जाणून घेऊया सविस्तर माहिती... 

वज्रासनाचा सराव कसा करावा? | Benefits of Performing Vajrasana On Empty Stomach 

  • वज्रासनाचा सराव करण्यासाठी सर्वप्रथम पाय सरळ ठेवून जमिनीवर बसा.
  • यानंतर एक-एक पाय मागील बाजूस न्यावा किंवा कोणत्याही एका बाजूने दोन्ही पाय मागील बाजूस न्यावे.  
  • दोन्ही पाय मागील बाजूस नेल्यानंतर शक्य असेल तर अंगठ्याला अंगठा चिकटवा आणि टाचांवर बसा.  
  • दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. पाठीचा कणा ताठ असावा, मान सरळ ठेवा. डोळे बंद करून ध्यान करा.
  • तुमच्या क्षमतेनुसार आसनामध्ये बसावे आणि यानंतर ज्या क्रमाने आसन केले होते त्यानुसार आसनातून बाहेर यावे.

वज्रासनाचा सराव किती वेळ करावा?

हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, वज्रासनामध्ये 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसू नये. सुरुवातीस तुम्ही 30 सेकंद सराव करावा किंवा स्वतःच्या क्षमतेनुसार सराव करावा. हळूहळू सरावाचा वेळ वाढवावा. 

रिकाम्या पोटी वज्रासनाचा सराव करण्याचे फायदे

गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून सुटका हवी असल्यास रिकाम्या पोटी वज्रासनाचा सराव करावा. यासह पचनप्रक्रिया देखील मजबूत होण्यास मदत मिळेल.  

Advertisement

(नक्की वाचा: Date Milk Benefits: खजुराचं दूध प्यायल्यास कोणते आजार दूर होतील? कसे तयार करावं दूध, कोणी करावा हा उपाय?)

वज्रासनाचे फायदे | Benefits of Vajrasana 

चिंताविकार कमी होतो

हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, वज्रासनाचा सराव केल्यास ताण आणि चिंताविकार कमी होण्यास मदत मिळेल, मेंदू शांत होईल.   

हृदयाचे आरोग्य

नियमित वज्रासनाचा सराव केल्यास रक्तबादाची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळते आणि हृदयाच्या गती देखील सामान्य राहते.  

(नक्की वाचा: BCA Juice Benefits: गाजर, बीट, आवळा रस प्यायल्यास काय होतं? डिटॉक्स ज्युसमुळे चेहऱ्यामध्ये घडतील इतके मोठे बदल)

स्नायू मजबूत होतील 

वज्रासनामध्ये बसल्यास पाय, पाठ, मानेच्या भागातील स्नायू मजबूत होतील, तसंच शरीर देखील लवचिक होईल. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)