Clove Water: 15 दिवस रोज रिकाम्या पोटी लवंगचे पाणी प्यायल्यास कोणते आजार दूर होतील?

Clove Water: थंडीच्या दिवसात सलग 15 दिवस रिकाम्या पोटी लवंगचे पाणी प्यायल्यास शरीरामध्ये कोणते बदल होतील, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Clove Water: लवंगचे पाणी पिण्याचे फायदे"
Canva

Clove Water Benefits: गरम मसाल्यांचा वापर केवळ स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी केला जात नाही तर याद्वारे आरोग्यासही मोठ्या प्रमाणात फायदे मिळतात. यापैकीच एक लवंग देखील आहे, आकाराने दिसायला छोटीशी असणारी लवंग शरीरासाठी प्रचंड लाभदायक आहे. लवंगमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी6, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, झिंक, मॅग्नीज, लोह यासह असंख्य गुणधर्मांचा साठा आहे. लवंगचे पाणी प्यायल्यास शरीरास कोणते फायदे मिळतील, जाणून घेऊया...

लवंगचे पाणी कसे तयार करावं? (How To Make Clove Water)

लवंगचे पाणी तयार करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. हे पाणी तयार करण्यासाठी सर्वप्रथम दोन लवंग ग्लासभर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर लवंगसह पाणी उकळा आणि गाळून प्यावे. 

लवंगचे पाणी पिण्याचे फायदे (Clove Water Benefits) 

1. लठ्ठपणा 

वजन कमी करायचं असेल तर लवंगचे पाणी पिऊ शकता. यामुळे शरीराची चयापचयाची गती जलद होईल आणि फॅट्स बर्न होतील. परिणामी शरीराचे वजन कमी होण्यास मदत मिळेल. 

2. त्वचा 

लवंगचे पाणी पिणे त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. यामध्ये मुख्यतः अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-बॅक्टेरिअल, अँटी- इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल.

Advertisement

(नक्की वाचा: Navel Oiling Benefits: रात्री झोपताना नाभीवर तेल लावल्यास काय होते? कोणते तेल वापरणं ठरेल सर्वाधिक फायद्याचं)

3. केस

केसांसाठी लवंगचे पाणी पिण्याऐवजी ते थेट केस आणि स्कॅल्पवर लावण्याचा सल्ला दिला जातो. कारण याचे फायदे मुख्यतः बाहेरील उपयोगाशी संबंधित आहेत. 

Advertisement

(नक्की वाचा: Drinking Hot Water Side Effects: सकाळी रिकाम्या पोटी कोणी गरम पाणी पिऊ नये? कारणं वाचून बसेल मोठा धक्का)

4. पचनप्रक्रिया

थंडीच्या दिवसांत पोटाशी संबंधित समस्यांमुळे त्रस्त असाल तर लवंगचे पाणी प्यावे. लवंगच्या पाण्यामुळे गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटी यासारख्या समस्यांपासून सुटका मिळेल आणि पचनप्रक्रिया निरोगी राहील. 

Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

(हेडलाइन वगळता या बातमीमध्ये एनडीटीव्ही टीमने काहीही बदल केलेले नाहीत. ही सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.)