Curry Leaves Benefits: रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्यास काय होते? फक्त 3 पानांमुळे मिळतील जबरदस्त फायदे

Curry Leaves Benefits: रोज सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याची तीन पाने खाल्ल्यास शरीरास कोणकोणते लाभ मिळतील, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Curry Leaves Benefits: रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्यास काय होते?"

Curry Leaves Benefits: भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये कढीपत्त्याचे विशेष स्थान आहे. कढीपत्त्यामुळे स्वयंपाकाची चव वाढण्यास मदत मिळते. ही छोटी-छोटी पाने आपल्या आरोग्यासाठी नॅचरल मल्टिव्हिटॅमिनप्रमाणे काम करतात. प्रसिद्ध न्युट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलंय की, रोज सकाळी कढीपत्त्याची केवळ तीन पाने खाल्ल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळतील.   

सतेज त्वचा

न्युट्रिशनिस्टने सांगितलेल्या माहितीनुसार, कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटिन नावाच्या तत्त्वांमुळे त्वचेवर चमक येण्यास मदत मिळते. त्वचेवरील निस्तेजपणा आणि सुरकुत्या कमी होण्यास तसेच डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळेल. 

रोगप्रतिकारकशक्ती आणि सुंदर कांती

कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन सी, ई आणि अँटी-ऑक्सिडंट्स हे गुणधर्म आहेत. जे शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. यामुळे त्वचा निरोगी आणि तरुण राहण्यासह शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.   

ऊर्जा आणि मेंदूचे आरोग्य

कढीपत्त्यातील B-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्समुळे शरीराची चयापचयाची गती जलद होण्यास मदत मिळते. थकवा दूर होण्यास आणि मेंदूची कार्यप्रणाली सुधारण्यास मदत मिळते. लक्ष केंद्रित होण्यासह मूड देखील चांगला राहण्यास मदत मिळते.

Advertisement

रक्ताची कमतरता भरुन निघेल

कढीपत्त्यामध्ये लोह आणि फॉलिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असते. या दोन्ही तत्त्वांमुळे शरीरातील रक्तपेशी तयार होण्यास मदत मिळते आणि अ‍ॅनिमियाची समस्या दूर होण्यास मदत मिळते.   

हाडे मजबूत होतील

कढीपत्त्यामध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरस हे तत्त्व जास्त प्रमाणात आहेत. 100 ग्रॅम कढीपत्त्यामध्ये जवळपास कॅल्शिअमचे प्रमाण 659 mg असते. यामुळे हाडे मजबूत होण्यास आणि हाडांची घनता वाढण्यास मदत मिळते. 

Advertisement

कढीपत्त्याचे सेवन कसे करावे?

  • सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याची तीन ते चार पाने चावून खा आणि त्यावर थोडेसे कोमट पाणी प्या. 
  • स्मूदीमध्येही कढीपत्त्याचा समावेश करू शकता.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)