Home Remedies For Gas: दैनंदिन जीवनातील धावपळीमुळे पोटामध्ये होणाऱ्या गॅसची समस्या सामान्य आहे. पण ही समस्या कितीही किरकोळ वाटत असली तरीही भविष्यात गंभीर शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. केवळ गॅस म्हणून लोक याकडे दुर्लक्ष करतात. पण यामुळे पचनप्रक्रियेसह संपूर्ण जीवनशैलीवर याचे दुष्परिणाम होतात.
पोटामध्ये गॅस का तयार होतो?
अन्नाचे पचन योग्यरित्या होत नाही, तेव्हा आतड्यांमध्ये किण्वन प्रक्रिया सुरू होते. म्हणजे पोटामध्ये कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन आणि मिथेन यासारखे वायू तयार होतात. परिणामी पोट जड होणे, पोटफुगी, ढेकर येणे, पोटदुखी यासारख्या समस्या उद्भवतात.
पोटात गॅस होण्यामागील कारणं
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, वेळीअवेळी खाणे, तेलकट-तिखट पदार्थ, फास्ट फुडचे अतिरिक्त सेवन करणे. तसेच घाईघाईत जेवणे, घास व्यवस्थित न चावणे, अन्न न चावत गिळणे आणि मानसिक ताण इत्यादी
(नक्की वाचा: Jeera Detox Water: सुटलेले पोट लगेच जाईल आत, फॅट्स होतील कमी; सकाळी प्या हे आरोग्यवर्धक पाणी)
आयुर्वेदानुसार पचनशक्ती (जठराग्नी) कमकुवत असणे हे गॅस होण्याचे मूळ कारण आहे. रात्री उशीरापर्यंत जागणे, वेळेवर न जेवणे आणि कार्बोनेटेड पेय किंवा डाळींचे जास्त प्रमाणात सेवन करणे या गोष्टीही पोटात गॅस होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
पोटातील गॅस कमी करण्यासाठी घरगुती उपाय
चिमूटभर ओवा, काळे मीठ, आले
- आल्याचा चहा प्यावा किंवा आले काळ्या मिठासह चावून खाल्ल्यास पचनाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळू शकते.
- जेवणानंतर बडीशेप चावून खा किंवा बडीशेपचे पाणी प्यावे,यामुळे पोटात गॅस तयार होणार नाही.
हिंग पावडर आणि लिंबाचे पाणी
- कोमट पाण्यामध्ये हिंग पावडर आणि लिंबाचा रस मिक्स करुन प्यायल्यास पोटातील गॅस बाहेर पडेल.
- लिंबू पाणी आणि त्रिफळा चूर्ण देखील रामबाण उपाय ठरू शकतो.
(नक्की वाचा: Weight Loss News: सुटलेले पोट काही दिवसांत होईल सपाट, 2 गोष्टी पाण्यात मिक्स करुन प्या; फॅट्स पटापट होतील बर्न)
योगासनांमुळे मिळेल आराम
- डाएटसह नियमित व्यायाम देखील करावा.
- नियमित चालण्याचा व्यायाम करावा.
- पवनमुक्तासन आणि वज्रासनाचा सराव केल्यास पोटातील गॅस बाहेर पडण्यास मदत मिळेल.
- ध्यानधारणा, मेडिटेशन केल्यास मानसिक ताण दूर होण्यास मदत मिळेल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)