Vitamin D: उन्हाव्यतिरिक्त व्हिटॅमिन डी कसे मिळवावे? या टिप्स फॉलो केल्यास रॉकेट स्पीडने वाढेल Vitamin D 

Vitamin D: ऊन आणि औषधांची मदत न घेता शरीरातील व्हिटॅमिन डीची पातळी तुम्हालाही वाढवायचीय का, तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
"Health News: उन्हाशिवाय व्हिटॅमिन डी कसे मिळवावे"
Canva

Vitamin D: शरीरासाठी कित्येक व्हिटॅमिन्स महत्त्वाचे असतात. व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे असंख्य शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यापैकीच एक महत्त्वाचे व्हिटॅमिन म्हणजे व्हिटॅमिन डी. हाडांसह स्नायू, शरीराची रोगप्रतिकारकशक्ती, हृदयाच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन डी अतिशय आवश्यक आहे. व्हिटॅमिन डीचा उत्तम स्त्रोत म्हणजे ऊन. पण धावपळीच्या जीवनात लोकांना शांततेत उन्हात बसणंही शक्य होत नाही. ऊन तसेच औषधांच्या मदतीने व्हिटॅमिन डी मिळवायचे नेसल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. डाएटमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

1. दुग्धजन्य पदार्थ 

दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणं फायदेशीर ठरेल. व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी रोज एक ग्लास दूध प्यावे. याव्यतिरिक्त दुग्धजन्य पदार्थ म्हणजे स्मूदी इत्यादी गोष्टींचाही डाएटमध्ये समावेश करावा.  

2. मासे  (Fish)

व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी डाएटमध्ये मासे तुम्ही खाऊ शकते. फॅटी फिशमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण खूप असते. तळलेले मासे खाऊ नये, यामुळे व्हिटॅमिन डी कमी होऊ शकते.  

Advertisement

(नक्की वाचा: Better Sleep Tips: रात्री झोपल्यानंतरही दिवसा देखील गाढ झोप का येते? ही आहेत गंभीर कारणं)

3. मशरूम (Mushroom)

मांसाहार करत नसाल तर डाएटमध्ये मशरूमचा समावेश करावा. मशरूम उन्हामध्ये सुकवले जाते, ज्यामुळे व्हिटॅमिन डीचे प्रमाण वाढते; असे म्हणतात. मशरूम खाल्ल्यास हृदयाचे आरोग्य आणि हाडे मजबूत होतील. वजन कमी करण्यासाठी मशरूम लाभदायक मानले जाते. 

Advertisement

(नक्की वाचा: Clove Water: 15 दिवस रोज रिकाम्या पोटी लवंगचे पाणी प्यायल्यास कोणते आजार दूर होतील?)

4. अंडे (Egg)

रोज एक अंडे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. अंड्यातील बलकमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण जास्त असते, याद्वारे शरीराला प्रोटीनचाही पुरवठा होतो. रोज एक उकडलेले अंडे खावं. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Topics mentioned in this article