- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन वयाच्या 73व्या वर्षीही एकदम फिट
- पुतिन यांचे डाएट सीक्रेट
- पुतिन सकाळच्या नाश्त्यामध्ये काय खातात?
Vladimir Putin Fitness Diet: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन राजकारणाव्यतिरिक्त त्यांच्या फिटनेसमुळेही चर्चेत असतात. वयाच्या 73व्या वर्षी पुतिन एखाद्या तरुणाप्रमाणे पूर्णतः फिट आहेत. फिटनेस आणि मजबूत शरीरयष्टीसाठी पुतिन जगभरात प्रसिद्ध आहेत. नेटकरी त्यांच्या फिटनेसचं रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतायेत. पुतिन यांच्या डेली रुटीनबाबत सांगायचे झाले तर ते अशा कोणत्याही विशिष्ट पदार्थांचे सेवन करत नाहीत. पुतिन डाएटमध्ये साध्या, पारंपरिक आणि हाय प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करतात.
पुतिन यांचे डाएट आणि फिटनेसचे सीक्रेट
आवडीचे आणि ज्याद्वारे शरीराला ऊर्जा मिळेल, असे पदार्थ खाणे पुतिन पसंत करतात. नाश्त्यामध्ये दलिया खायला आवडतं का? असा प्रश्न त्यांना एका मुलाने 2016मध्ये एका टेलिव्हिजन कार्यक्रमात विचारला होता. यावर उत्तर देत पुतिन यांनी म्हटलं की, "मी रोज दलिया आवडीने खाऊ शकतो".
पुतिन कोणत्या पदार्थांचे सेवन करतात?
पत्रकार बेन जुडाह यांच्या माहितीनुसार, पुतिन झोपेतून उठल्यानंतर पोटभर पण साध्या पद्धतीचा नाश्ता करतात. जुडाह यांनी लिहिलेल्या पुतिन यांच्यासंदर्भात लिहिलेल्या पुस्तकातील माहितीनुसार, "पुतिन पनीर, ऑम्लेट किंवा कधीकधी दलियाही खातात. Quail नावाच्या पक्षाची अंडी खायला त्यांना आवडतात, याव्यतिरिक्त ते फळांचा ज्युसही पितात".
(नक्की वाचा: Banana Benefits: केळ खाण्याची योग्य वेळ कोणती? केळी खाल्ल्यास कोणते फायदे मिळतील? केळ कधी खाऊ नये)
पुतिन यांनी 2019मध्ये जारग्रेड टीव्हीशी बातचित करताना सांगितलं होतं की, "खाण्याच्या बाबतीत माझ्या काही खास आवडीनिवडी नाहीत. मला टोमॅटो, काकडी यासारख्या फळभाज्या आवडतात. सकाळी दलिया, पनीर आणि मध इत्यादी. मांसाहारामध्ये मला मासे खायला आवडतात".
(नक्की वाचा: Ghee Benefits: रोज कोमट पाण्यात 1 चमचा तूप मिक्स करून प्यायल्यास काय होतं? न्युट्रिशनिस्टने सांगितले 5 फायदे)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)