- गरम पाण्यात पाय ठेवल्यास स्नायूंना आराम मिळेल
- मिठाच्या गरम पाण्यात पाय ठेवल्यास पायांचे दुखणे कमी होईल
- गरम पाण्यात पाय ठेवून बसल्यास पायांचे दुखणे कमी होईल
Benefits Of Soaking Legs In Hot Water: गरम पाण्यामध्ये पाय ठेवणे हा एक साधा आणि रामबाण घरगुती उपाय आहे. वारंवार चालण्याफिरण्याने, तास-न्-तास उभे राहिल्याने पायांसह संपूर्ण शरीरावर ताण येतो, गरम पाण्यात पाय ठेवल्यास दिवसभराचा थकवा दूर होईल. याद्वारे शरीरासह मनाला शांतता मिळते. गरम पाण्यात पाय ठेवल्यास रक्तप्रवाह सुधारेल, ताण कमी होईल. झोपण्यापूर्वी कित्येक जण हा उपाय करतात, कारण यामुळे शरीराला असंख्य फायदे मिळतात.
गरम पाण्यात पाय ठेवल्यास काय होते? (What Happens When You Soak Your Feet In Warm Water)
गरम पाण्यात पाय ठेवल्यास शरीराचं तापमान वाढते, ज्यामुळे रक्तप्रवाहाची प्रक्रिया सुधारते. हा उपाय केल्यास पायांच्या नसांवरील ताण आणि वेदना कमी होतील. दीर्घकाळ उभे राहून काम करावं लागत असेल तर या हीलिंग थेरेपीची तुम्ही मदत घेऊ शकता. गरम पाण्यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि शारीरिक थकवा दूर होतो.
गरम पाण्यामध्ये पाय ठेवणं चांगलं असतं का? (Is It Good To Soak Your Feet In Warm Water)
हो, अगदी! गरम पाण्यामध्ये पाय ठेवणं पूर्णपणे सुरक्षित आणि फायदेशीर आहे. पाय सूजले असतील, पाय दुखत असतील तर हा उपाय करणं फायद्याचे ठरेल. हिवाळ्यामध्ये पाय थंड पडतात आणि पायांचे दुखणं वाढतं, हा उपाय केल्यास शरीरातील रक्तप्रवाहाची प्रक्रिया सुधारेल.
गरम पाण्यात मीठ मिक्स करून पाय ठेवल्यास काय होईल? (Benefits Of Soaking Feet In Warm Salt Water)गरम पाण्यात मीठ मिक्स करुन त्यात पाय ठेवल्यास दुप्पट फायदे मिळतील, मिठामध्ये मॅग्नेशिअम आणि अन्य खजिनांचा समावेश आहे. यामुळे पायांना आलेली सूज कमी होईन शरीर डिटॉक्स होईल. पायांना दुर्गंध येत असल्यास, पायांवर सूज असल्यास मिठाच्या पाण्याचा वापर करावा. एप्सम सॉल्ट किंवा सैंधव मिठाचा वापर करणं फायदेशीर ठरेल. हिवाळ्यामध्ये 20 मिनिटांसाठी पाय गरम पाण्यात ठेवल्यास पायांना आराम मिळले.
(नक्की वाचा: Navel Oiling Benefits: रात्री झोपताना नाभीवर तेल लावल्यास काय होते? कोणते तेल वापरणं ठरेल सर्वाधिक फायद्याचं)
ताप असेल तर गरम पाण्यात पाय ठेवावे का? (What happens if you soak your feet in warm water during fever)ताप आल्यानंतर गरम पाण्यामध्ये पाय ठेवण्याचा घरगुती उपाय फार जुना आणि प्रभावी आहे. यामुळे शरीराचे तापमान संतुलित होण्यासह ताप कमी होण्यास मदत मिळते. पायांच्या नसा सक्रिय होतात आणि शरीराची ऊर्जा स्थिर होऊ लागते. यामुळे शरीरातील उष्णतेचा पायाच्या दिशेनं प्रवाह सुरू होता आणि ताप कमी होण्यास मदत मिळते. ताप असेल तर कपाळावर थंड पाण्याचा रुमाल ठेवणं हा उपायही प्रवाभी मानला जातो.
(नक्की वाचा: Frequent Urination Causes: रात्री वारंवार लघवीला उठावं लागतंय, जाणून घ्या डॉक्टरांनी या समस्येवर सांगितलेला रामबाण उपाय)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)