Fatigue Causes: काही केल्या तुमचाही थकवा जात नाही का? डॉक्टरांनी सांगितली समस्येमागील 11 कारणे

Fatigue Causes: काही लोक तर कोणत्या प्रकारचे काम न करताच थकतात, यामागील कारणं तुम्हाला माहितीयेत का? डॉ. रविंद्र कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर याबाबत महत्त्वाची पोस्ट शेअर केलीय.

जाहिरात
Read Time: 3 mins
Fatigue Causes: कोणत्या कारणांमुळे थकवा येतो?
Canva

Fatigue Causes In Marathi: काही लोक काही मिनिटे व्यायाम केल्यास, चालल्यासही थकतात. तर काही लोक काहीही न करताही थकता. बरं आलेला थकवा दूर करण्यासाठी कितीही उपाय केले तरीही आराम मिळत नाही. तुम्हाला तुमच्या थकण्यामागील कारण माहिती असणे आवश्यक आहे. समस्येमागील कारण समजल्यास तुम्हाला उपाय करणे सोपे जाईल आणि वारंवार येणाऱ्या थकव्याच्या त्रासातून सुटकाही मिळेल. थकवा येण्यामागील 11 वैद्यकीय कारणांची माहिती डॉ. रविंद्र कुलकर्णी (Dr Ravindra L. Kulkarni,MD) यांनी सोशल मीडियावर शेअर केली. 

थकवा येण्यामागील 11 वैद्यकीय कारणे | 11 Medical Reasons For Fatigue

1. ताण आणि अपुरी झोप

मानसिक ताण यामुळेही थकवा येतो. डोके थकले म्हणजे शरीर थकतेच. झोप पूर्ण न होणे, विचारांचे ओझे आणि सोशल मीडियाचा भडिमार यामुळे मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होतो. 

2. मधुमेह/ इन्सुलिन रेझिस्टन्स

शरीरातील रक्तशर्करेची पातळी वाढल्यास पेशींना ऊर्जा मिळत नाही. विशेषतः रक्तशर्करेची पातळी अति प्रमाणात वाढल्यानेही थकवा जाणवतो. जेवल्यानंतर जडपणा येणे, चिडचिड होणे, गोड खाद्यपदार्थ खाण्याची इच्छा वाढणे यासारख्या समस्याही उद्भवतात.

3. हृदयविकार (Heart Failure)

हृदयावाटे शरीराला होणाऱ्या रक्ताच्या प्रवाहावर परिणाम झाल्यासही थकवा येतो. म्हणजे शरीरामध्ये रक्ताचा प्रवाह कमी स्वरुपात होत असल्यास सतत थकवा येणे, दम लागणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. हृदयरोगाचा हा सुरुवातीचा टप्पा असू शकतो. 

Advertisement

4. श्वासोच्छवासाशी संबंधित आजार (COPD / Asthma)

सतत खोकला लागणे, दम लागणे आणि शरीराला ऑक्सिजनचा कमी प्रमाणात पुरवठा होणे, या गोष्टी देखील थकवा लागण्याकरिता कारणीभूत असू शकतात. फुफ्फुसांचे कार्य जसजसे कमी होते, तसे चालणंही कठीण वाटू लागते.

5. थायरॉइडमध्ये बिघाड (Hypothyroidism)

केसगळती, थंडी वाजणे, आळस वाढणे या समस्यांचा तुम्ही सामना करत असाल थायरॉइडशी संबंधित वैद्यकीय तपासण्या करण्याची तुम्हाला आवश्यकता आहे. चयापचय गती देखील मंदावल्यास शरीराच्या ऊर्जेवर दुष्परिणाम होतो.  

Advertisement

6. फास्टफूड आणि पौष्टिक आहाराचा अभाव

शरीराला प्रोटीन, लोह, व्हिटॅमिन B12, मॅग्नेशिअम यासारख्या पोषणतत्त्वांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. दिवसभर केवळ चहा-बिस्किट, प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करुन शरीरातील ऊर्जा टिकून राहणार नाही. 

7. यकृताचे विकार / Fatty Liver

यकृत म्हणजे ऊर्जेचे रिफायनरी सेंटर पण फॅटी लिव्हरमुळे ऊर्जेचे रुपांतर होणे थांबते, परिणामी थकवा वाढतो. 

Advertisement

(नक्की वाचा: Drinking Black Coffee On Empty Stomach Benefits: रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी प्यायल्यास काय होते?)

8. अ‍ॅनिमिया (Low Hemoglobin)

शरीरामध्ये हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास थकवा येणे, चक्कर येणे, थंडी वाजणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. विशेषतः महिलांमध्ये आढळणाऱ्या अ‍ॅनिमियाच्या समस्येमुळेही थकवा जाणवू शकतो. 

9. स्थूलता (Obesity)

लठ्ठपणामुळेही घाम येतो आणि थकवाही जाणवतो.

10. औषधांचे दुष्परिणाम 

काही ठराविक प्रकारच्या औषधांमुळेही थकवा जाणवू शकतो.

11. दैनंदिन आजारपण आणि मानसिक थकवा

कधी कधी आजारी असलेल्या घरातल्या सदस्याची काळजी घेता-घेता आपणही थकूनही जातो. Caregiver fatigue ही सुद्धा आजारासारखीच गंभीर स्थिती असते.

थकव्यावर काय उपाय करता येईल?

थकवा का येतोय, यामागील कारण जाणून घ्या; योग्य निदान आणि उपचारामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)