Amla Juice Benefits: आवळा हे एक असे सुपरफुड आहे, जे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, फ्लेव्होनॉइड्स यासारख्या गुणधर्मांचा मोठा साठा आहे. सलग 15 दिवस आवळ्याचा ज्युस प्यायल्यास काय होते, कोणत्या आजारांपासून सुटका होऊ शकते? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
आवळ्याचा ज्युस कसा तयार करावा? (How To Make Amla Juice)
सामग्री-
- आवळा
- पाणी
आवळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या आणि त्याचे छोटे-छोटे तुकडे करा. मिक्सरमध्ये पाण्यासह आवळा वाटून घ्या. ज्युस तुम्ही गाळून पिऊ शकता किंवा न गाळताही पिऊ शकता.
आवळा ज्युस पिण्याचे फायदे (Amla Juice Benefits)
1. डोळे
आवळा ज्युस पिणे डोळ्यांसाठी फायदेशीर मानले जाते. यातील कॅरोटिन गुणधर्मामुळे दृष्टीला फायदे मिळतात आणि डोळ्यांशी संबंधित समस्यांपासूनही सुटका मिळते.
2. लठ्ठपणा
आवळा ज्युसमुळे शरीराची चयापचयाची गती जलद होते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात; ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.
3. केस
आवळ्यातील अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिनमुळे केस मजबूत, घनदाट आणि चमकदार होऊ शकतात. केसगळती आणि पांढऱ्या केसांची समस्याही दूर होण्यास मदत मिळू शकते.
4. पचनप्रक्रिया
आवळा ज्युसमुळे पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते, पोटाशी संबंधित समस्या बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि गॅस यासारख्या समस्या दूर होऊ शकतात.
NOTE : जास्त प्रमाणात आवळा खाणे टाळावे, यामुळे पोटाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)