Amla Benefits: रोज 1 आवळा खाल्ल्यास कोणत्या आजारांपासून मुक्तता मिळेल? आवळा कोणी खाऊ नये? 13 FAQs

Amla Benefits and Side Effects: आवळा खाण्याचे फायदे आणि नुकसान, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

जाहिरात
Read Time: 5 mins
"Amla Benefits: आवळा खाण्याचे फायदे आणि नुकसान"
Canva

Amla Benefits and Side Effects: आयुर्वेदामध्ये आवळा हे सुपरफुड मानले जाते. या छोट्याशा हिरव्या रंगाच्या फळाचे सेवन केल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळतील. आवळ्यातील पोषणतत्त्वांमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते, वृद्धत्वाची लक्षणे कमी होतील, केस आणि त्वचेचे आरोग्य सुधारेल. रोज एक आवळा खाल्ल्यास आरोग्यामध्ये कोणकोणते चमत्कारी बदल घडतील, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया... 

रोज एक आवळा खाण्याचे फायदे | Benefits of Eating 1 Amla Daily

1. इम्युनिटी बूस्टर

आवळ्यातील व्हिटॅमिन सीचे प्रमाण संत्र्याच्या तुलनेत जास्त असते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते आणि सर्दी-खोकल्याच्या समस्येपासूनही बचाव होतो. 

2. पचनप्रक्रिया 

आवळ्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते आणि पोट स्वच्छ राहण्यास मदत मिळते. 

3. केस आणि त्वचेसाठी वरदान

आवळ्यातील पोषणतत्त्वांमुळे केसगळती कमी होऊन केस घनदाट आणि चमकदार होतील. यासह त्वचेवर नैसर्गिक तेज येईल. 

4. मधुमेहग्रस्तांसाठी लाभदायक

मधुमेहग्रस्तांसाठी आवळा खाणे लाभदायक ठरेल, कारण यामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते. 

5. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

आवळ्यातील पोषणतत्त्वांमुळे शरीरातील कोलेस्टेरॉल आणि रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहण्यात मदत मिळेल, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होईल. 

6. लिव्हर डिटॉक्स होईल

आवळ्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास लिव्हर डिटॉक्स होईल आणि शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातील. 

7. वेटलॉस 

शरीराची चयापचयाची गती जलद होईल, भूक नियंत्रणात राहील परिणामी वजन कमी होण्यास मदत मिळेल. आवळा खाल्ल्यास फॅट्स बर्न होतील. 

आवळा खाणे कोणत्या लोकांसाठी ठरेल फायदेशीर?

  • मधुमेह : रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.   
  • हाय ब्लड प्रेशर: ब्लड प्रेशर संतुलित राहण्यास मदत मिळेल. 
  • कॅन्सरग्रस्त: आवळ्यातील अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील कॅन्सर पेशींविरोधात लढतात.
  • पचनप्रक्रिया : बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी, गॅसच्या समस्येतून सुटका मिळेल.
  • त्वचा रोग: पिंपल्स, सुरकुत्या, डाग कमी होण्यास मदत मिळेल. 
  • केसांच्या समस्या: केसगळती, केसातील कोंड कमी होईल.  

कोणत्या लोकांनी आवळा खाऊ नये?| Who Should Not Eat Amla?

  • लो ब्लड शुगर समस्या: रक्तशर्करेची पातळी कमी होण्याचा त्रास असल्यास आवळा जास्त प्रमाणात खाऊ नये. 
  • अ‍ॅसिडिटी समस्या: आवळा चवीला आंबट असतो, यामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास वाढू शकतो. 
  • किडनी स्टोन समस्या: आवळ्यातील ऑक्सालेट कम्पाउंडमुळे मूतखड्याची समस्या वाढेल. 
  • शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आवळा खाणे टाळावे, कारण यामुळे रक्त पातळ होते.  

आवळा खाण्याचे दुष्परिणाम | Side Effects of Amla

  • जास्त प्रमाणात आवळा खाल्ल्यास पोटात जळजळ होऊ शकते. 
  • काही लोकांना अ‍ॅलर्जी होऊ शकते. 
  • जास्त प्रमाणात आवळा खाल्ल्यास शरीर डिहायड्रेट होईल. 

आवळ्याशी संबंधित 13 महत्त्वपूर्ण प्रश्न  FAQs  

1. रोज किती प्रमाणात आवळा खाणे आवश्यक?| How Many Amla Should Be Eaten Daily?

साधारणतः रोज एक किंवा दोन आवळे खाणे पुरेसे ठरेल. याद्वारे शरीराला व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबरचा पुरवठा होईल. तुम्ही आवळ्याची पावडर किंवा ज्युस पिणार असाल तर त्याचे प्रमाण मर्यादित स्वरुपात असावे. आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात आवळा खाल्ल्यास अ‍ॅसिडिटी, पोटात जळजळ होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.  

2. रिकाम्या पोटी आवळा खाऊ शकतो का? | Can Amla Be Eaten On An Empty Stomach?

हो, रिकाम्या पोटी आवळा खाणे फायदेशीर ठरते, यामुळे शरीराला पोषणतत्त्वांचा चांगल्या पद्धतीने पुरवठा होतो. पण अ‍ॅसिडिटी आणि गॅसची समस्या असल्यास जेवणानंतर आवळ्याचे सेवन करावे.

3. आवळा पावडर खाणेही फायदेशीर असते का? | Is Amla Powder Equally Beneficial?

हो, आवळा पावडरचे सेवन केल्यासही आरोग्यास तितकेच लाभ मिळतील. पाणी, मध किंवा गरम दुधामध्ये आवळा पावडर मिक्स करून खाऊ शकता.  

Advertisement

4. आवळ्याचा रस कधी प्यावा? | When Should Amla Juice Be Consumed?

सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस पिणे फायदेशीर मानले जाते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल आणि पचनप्रक्रिया सुधारेल. नियमित स्वरुपात आवळ्याचा रस प्यायल्यास त्वचा, केस आणि शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल. 

5. उन्हाळ्यात आवळ्याचे सेवन करावे? Should Amla Be Eaten In Summer?

हो, उन्हाळ्यात आवळ्याचे सेवन केल्यास शरीराला थंडावा मिळेल. उष्माघातापासून शरीराचे संरक्षण होईल आणि शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहील. डिहायड्रेशनच्या समस्येपासून बचाव होईल. 

Advertisement

6. लहान मुलांना आवळा खायला द्यावा का? | Can Amla Be Given To Children?

हो, पण लहान मुलांना अतिशय कमी स्वरुपात आवळा खायला द्यावा. आवळा कँडी, मुरांबा किंवा ज्युस या स्वरुपात लहान मुलांच्या डाएटमध्ये आवळ्याचे समावेश करावा. यामुळे शरीराची पचनप्रक्रिया सुधारेल.

Advertisement

(नक्की वाचा: Turmeric Water Benefits: रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे पाणी प्यावे का? हळद किती वापरावी? आयुष्य बदलणारी IMP माहिती)

7. गर्भवती महिलांनी आवळ्या सेवन करणं सुरक्षित ठरेल का? | Is Amla Safe For Pregnant Women?

गर्भवती महिलांनी आवळा खाणे सुरक्षित ठरू शकते, कारण यामध्ये लोह, व्हिटॅमिन सी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. बद्धकोष्ठता, थकवा यासारख्या समस्यांपासून सुटका मिळेल. पण गर्भवतींनी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. 

8. आवळा केसांना लावणे फायदेशीर आहे का?| Is applying Amla On Hair Beneficial? 

हो, केसांच्या आरोग्यासाठी आवळा अतिशय फायदेशीर ठरेल. आवळ्याचे तेल किंवा आवळ्याच्या पेस्टमुळे केस मुळासकट मजबूत होतील, कोंडा कमी होईल. आवळ्याची पावडर किंवा ज्युस मेंदी किंवा शिकेकाईमध्ये मिक्स करून लावू शकता.  

9. वजन कमी होईल का?| Does Amla Help In Weight Loss?

हो, आवळ्यातील पोषणतत्त्वांमुळे शरीराची चयापचयाची गती जलद होते, यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळेल. भूक नियंत्रणात राहील आणि पचनप्रक्रिया सुधारेल.  

10. आवळा खाल्ल्यास झोप चांगली येते का?| Does Eating Amla Help You Sleep Better?

आवळ्यातील पोषणतत्त्वांमुळे तणाव कमी होऊन मेंदू शांत होतो. यातील अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्समुळे मानसिक थकवा दूर होतो, ज्यामुळे शांत झोप मिळते.  

(नक्की वाचा: Better Sleep Tips: रात्रभर कुस बदलत राहता, झोप येत नाही? या अवयवांवर दाब द्या, शांत आणि गाढ झोप लगेचच येईल)

11. आवळ्यामुळे कॅन्सरसारख्या आजारांचा धोका कमी होतो का?

आवळ्यातील अँटी-ऑक्सिडंट्सचे घटक शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. फ्री रॅडिकल्समुळे शरीरात कॅन्सर पेशींची निर्मिती होते, हा धोका टाळण्यासाठी नियमित स्वरुपात आवळ्याचे सेवन करावे.  

12. आवळ्यामुळे रक्त शुद्ध होते का? | Does Amla Purify Blood?

आवळ्यातील पोषणतत्त्वांमुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते. रक्तातील विषारी घटकही बाहेर फेकले जातात, यामुळे त्वचा सुंदर आणि चमकदार दिसू लागते. 

13. आवळ खाल्ल्यास त्वचेवर कोणते परिणाम होतात?| Amla Benefits For Skin 

आवळ्यातील पोषणतत्त्वांमुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते. यातील व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचा तरुण राहते, सुरकुत्या-पिंपल्सची समस्या कमी होते. नियमित स्वरुपात आवळा खाल्ल्यास त्वचा सुंदर होण्यास मदत मिळेल.  

(नक्की वाचा: Glowing Face Tips: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे चेहरा काळा पडू लागतो? काय खाल्ल्यास चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येईल)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)