Lavang Benefits: रात्री लवंग खाऊन झोपल्यास काय होतं? 1 दिवसात किती लवंग खावी? न्युट्रिशनिस्टने सांगितली माहिती

Lavang Benefits: रोज रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्यास काय होतं? एका दिवसात किती लवंग खावी? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Lavang Benefits: रात्री लवंग खाऊन झोपल्यास काय होईल?"
Canva

Lavang Benefits: भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये गरम मसाल्यातील लवंगास अतिशय महत्त्व आहे. इवल्याशा लवंगमुळे स्वयंपाकाची चव वाढतेच शिवाय आरोग्यासही असंख्य फायदे मिळतात. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाऊन झोपणे शरीरासाठी लाभदायक मानले जाते. न्युट्रिशनिस्ट राजमनी पटेल यांनी इन्स्टाग्राम हँडलवर लवंगाचे फायदे सांगणारा व्हिडीओ शेअर केलाय, सविस्तर माहिती जाणून घेऊया... 

झोपण्यापूर्वी लवंग खाण्याचे फायदे 

पचनप्रक्रिया

लवंगातील पोषणतत्त्वांमुळे पचनाशी संबंधित एंझाइम्स स्त्राव वाढतो. यामुळे गॅस, अ‍ॅसिडिटी, अपचन आणि पोट फुगणे यासारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळेल.

शरीराची रोगप्रतिकारकशक्ती

लवंगमध्ये (Clove Benefits) युजेनॉल नावाचे शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्सचा समावेश आहे, ज्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरल इंफेक्शनविरोधात लढण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.  

रात्रीच्या खोकल्यापासून मिळेल सुटका

लवंगातील पोषणतत्त्वांमुळे घशातील खवखव आणि कफची समस्या दूर होण्यास मदत मिळेल. रात्री झोपेत असताना येणाऱ्या खोकल्याची समस्याही कमी होण्यास मदत मिळेल.   

सूज आणि वेदना कमी होईल

लवंगातील औषधी गुणधर्मामुळे शारीरिक वेदना आणि सूज कमी होण्यास मदत मिळेल. दातदुखी, घसादुखी, शारीरिक वेदनाही दूर होण्यास मदत मिळेल. 

झोपेची गुणवत्ता सुधारेल

लवंगातील काही तत्त्वांमुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत मिळेल, ज्यामुळे गाढ झोप येण्यास मदत मिळेल. 

रक्तशर्करेची पातळी

लवंगातील पोषक घटकांमुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 

(नक्की वाचा: Green Tea Benefits: सलग 30 दिवस ग्रीन टी प्यायल्यास काय होतं? 1 दिवसात किती ग्रीन टी प्यावा?)

यकृताचे आरोग्य

लवंगातील युजेनॉल तत्त्वांमुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होण्यास मदत मिळू शकते. 

तोंडाला येणारा दुर्गंध

लवंगातील पोषणतत्त्वांमुळे तोंडातील जंतूंचा खात्मा होण्यास मदत मिळेल आणि तोंडाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल. तोंडाला येणाऱ्या दुर्गंधाचीही समस्या दूर होईल.
 
रात्रीच्या वेळेस लवंगाचे सेवन कसे करावे? 

Advertisement

न्युट्रिशनिस्टने दिलेल्या माहितीनुसार, लवंग हळूहळू चावून खा, यामुळे लवंगाचा अर्क पोटात जाईल.   

एका दिवसात किती लवंगाचे सेवन करावे? 

राजमनी पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोज एक लवंग खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. हवे असल्यास दोन लवंग खाऊ शकता, त्याहून जास्त लवंग खाणे हानिकारक ठरेल.  

Advertisement

(नक्की वाचा: Banana Benefits: रोज केळ खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतील? 1 दिवसात किती केळी खावी? वजन वाढेल की घटेल?)

या लोकांनी सावधगिरी बाळगावी?
  • गर्भवती किंवा स्तनदा मातांनी लवंग खाण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
  • अ‍ॅसिडिटी किंवा अल्सरची समस्या असल्यास लवंग खाणे टाळावे. 
  • रक्त पातळ होण्यासाठी औषधोपचार घेत असाल तर लवंग खाणे टाळावे. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Topics mentioned in this article