Navel Oiling Benefits: एरंडेल तेलामध्ये असंख्य औषधी गुणधर्मांचा खजिना आहे. एरंडेल तेल हे रिकिनस कम्युनिस वनस्पतीपासून तयार केले जाणारं तेल आहे; जे आरोग्य आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. एरंडेल तेलाने नाभीचा मसाज केल्यासअसंख्य फायदे मिळतील. योग्य प्रमाणात एरंडेल तेलाचा वापर केल्यास गॅस, बद्धकोष्ठता, आतड्यांची स्वच्छता, त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. एरंडेल तेलाचे फायदे सांगणारा व्हिडीओ डॉ. सुगंधा शर्मा यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय. जाणून घेऊया सविस्तर माहिती...
एरंडेल तेलाचे फायदे | Castor Oil Benefits
डॉक्टर सुगंधा शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाभीवर एरंडेल तेल लावल्यास असंख्य फायदे मिळतील. गॅस, आतड्यांची स्वच्छता आणि त्वचेच्या समस्या दूर होतील. एरंडेल तेलामध्ये पोषणतत्त्वांमुळे पचनप्रक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. एरंडेल तेलामध्ये कापूस बुडवून नाभीवर ठेवा, याद्वारे पोटातील गॅस तसेच बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल, त्वचा निरोगी राहील, आरोग्याशी संबंधित विविध आजारांपासून सुटका होईल. नाभी हे शरीराचे केंद्र असल्यानं रक्तवाहिन्यांच्या माध्यमांतून सक्रिय घटक शोषून घेण्याचा हा एक प्रभावी मार्ग असू शकतो.
रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर तेल लावल्यास काय होते?
रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर तेल लावल्यास पचनप्रक्रिया, त्वचा आणि केसांना कित्येक पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल. याद्वारे तणाव कमी होऊन चांगली झोप लागेल. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या त्रासातून महिलांची सुटका होईल. नाभी हे शरीराचे केंद्र बिंदू आहे आणि येथे तेल लावल्यास कित्येक समस्यांपासून सुटका होण्यास मदत मिळेल.
(नक्की वाचा: Relationship Tips: पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला झोपावं, डावीकडे की उजवीकडे? 99% लोकांना माहीतच नाही ही गोष्ट)
नाभीवर कोणते तेल लावणे सर्वाधिक फायदेशीर ठरेल?
नाभीवर कित्येक प्रकारचे तेल लावले जाऊ शकते. तुमच्या शरीराच्या आवश्यकतेनुसार तेलाची निवड करावी. नारळाचे तेल कोरड्या त्वचेसाठी, मोहरीचे तेल सांधेदुखी -पोटदुखीसाठी, एरंडेल तेल पचनप्रक्रिया सुधारण्यासाठी, तिळाचे तेल हार्मोनल संतुलनासाठी चांगले मानले जाते.
(नक्की वाचा: Frequent Urination Causes: रात्री वारंवार लघवीला उठावं लागतंय, जाणून घ्या डॉक्टरांनी या समस्येवर सांगितलेला रामबाण उपाय)
नाभीवर एरंडेल तेल लावण्याची योग्य पद्धत-
रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर एरंडेल तेल लावावे.
- नाभीवर दोन ते तीन थेंब एरंडेल तेल सोडावे.
- हलक्या हाताने गोलाकार मसाज करा.
- रात्रभर तेल नाभीवर राहू द्यावे.
- याव्यतिरिक्त एरंडेल तेलामध्ये बुडवलेला कापूस नाभीवर ठेवू शकता.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)