Carrot Juice Benefits: हिवाळ्यात बाजारामध्ये कित्येक पौष्टिक भाज्या-फळं उपलब्ध होतात. याच दिवसांत बाजारात गाजरांचीही आवक वाढते. हिवाळ्यात गाजर खाल्ल्यास किंवा गाजराचा ज्युस प्यायल्यास कोणकोणते फायदे मिळतील, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
अमेरिकन डॉक्टर एरिक बर्ग यांनी त्यांच्या यू-ट्युब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गाजराचा ज्युस पिण्याचे फायदे सांगितले आहेत. सलग 30 दिवस गाजर खाल्ल्यास किंवा गाजराचा ज्युस प्यायल्यास शरीरामध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळतील.
पचन आणि आतड्यांचे आरोग्य सुधारेल
गाजरामध्ये खूप फायबर असतात, जे पचनशक्तीसाठी फायदेशीर असते. फायबरमुळे आतड्यांची आतील बाजूने स्वच्छता होते आणि आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांची निर्मिती होते. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर गाजर खाणे फायदेशीर ठरेल.
डोळ्यांसाठी फायदेशीर
गाजरमध्ये बीटा-कॅरेटीन नावाचे पोषणतत्त्व आहे, ज्याचे शरीरामध्ये 'व्हिटॅमिन ए'मध्ये रुपांतर होते. व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. डाएटमध्ये गाजराचा समावेश केल्यास डोळ्यांशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल.
अँटी-ऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत
गाजरामध्ये कित्येक प्रकारचे अँटी-ऑक्सिडंट्सचा समावेश आहे. जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीराचे स्नायू निरोगी राहण्यास मदत मिळते. अँटी-ऑक्सिडंट्स शरीराचे फ्री-रॅडिकल्सपासून संरक्षण करतात, यामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होतील.
(नक्की वाचा: Sweet Potato Benefits: रताळं खाण्याची योग्य पद्धत कोणती, हिवाळ्यात रताळं खाल्ल्यास कोणते फायदे मिळतील?)
त्वचेसाठी फायदेशीर
30 दिवस सलग गाजराचा ज्युस प्यायल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक येईल. गाजरातील व्हिटॅमिन ए आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचेचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल. यामुळे मुरुम, कोरडी त्वचा आणि त्वचेवरील डाग कमी होतील.
शरीराची रोगप्रतिकारकशक्तीगाजरामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि अन्य पोषणतत्त्वांचा समावेश आहे, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.
(नक्की वाचा :Vitamin D: व्हिटॅमिन डी म्हणजे काय? सूर्यस्नानासाठीची योग्य वेळ, व्हिटॅमिन डीयुक्त डाएटसह जाणून घ्या महत्त्वाची माहिती)
या गोष्टींचीही काळजी घ्या- गाजर ज्युस रोज पिणे फायदेशीर आहे, पण मर्यादित स्वरुपात प्यावा.
- गाजरामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण आहे, त्यामुळे जास्त प्रमाणात ज्युस प्यायल्यास अपाय होऊ शकतात.
- मधुमेहग्रस्तांनी ज्युसऐवजी गाजर चावून खावा आणि तज्ज्ञांचाही सल्ला घ्यावा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )